Alia Bhatt : आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना, अर्जून कपूरची खास कमेंट

बी टाऊन
Updated May 19, 2022 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt : आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना झाली आहे. हॉलीवूड पदार्पणासाठी गॅल गॅडोटसोबत शूट करण्यासाठी आलिया भट्ट निघालेली आहे. अर्जुन कपूरने खास शैलीत कमेंट केली आहे.

Alia Bhatt leaves for Hollywood debut, Arjun Kapoor's special comment
आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना
  • हॉलीवूड पदार्पणासाठी गॅल गॅडोटसोबत शूट करण्यासाठी रवाना
  • अर्जुन कपूरने केली आहे खास कमेंट

Alia Bhatt : आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केले की ती तिच्या "पहिल्या हॉलिवूड चित्रपटासाठी" शूट करण्यासाठी जात आहे. सोबत आलियाने एक जबरदस्त सेल्फी शेअर केला आहे. अर्जुन कपूरने तिच्या पोस्टवर त्वरित प्रतिक्रिया दिली आणि एक मजेदार कमेंट केली आहे.


SS राजामौली यांच्या RRR मधून दक्षिणेकडील चित्रपटात पदार्पण केल्यानंतर, आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी निघाली आहे.  ही वंडर वुमन अभिनेत्री गॅल गॅडॉटसोबत एका चित्रपटात काम करणार आहे आणि आज ती शूटसाठी निघाली आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या फ्लाइटमधून एक जबरदस्त सेल्फी शेअर केला.फोटोसोबत, तिने तिच्या कॅप्शनमध्ये खुलासा केला की ती तिच्या हॉलीवूड पदार्पणाबद्दल नर्व्हस आहे आणि असे वाटते की ती पुन्हा एकदा स्ट्रगलर आहे. तिने कॅप्शन लिहिले आहे, "आणि मी माझ्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला निघाले आहे!!!! पुन्हा न्यूकमरसारखे वाटत आहे - फिलींग नर्व्हस!!!! तुमच्या शुभेच्छांची मला गरज आहे"

आलियाने ही पोस्ट शेअर करताच, अर्जुन कपूरने लगेच कमेंट केली आहे त्याने 'नर्व्हस' आलियासाठी एक हलकी-फुलकी, मजेदार कमेंट केली आहे. 


अभिनेत्याने तिला "आंतरराष्ट्रीय खिलाडी" म्हटले आणि फायर इमोजीसह आपली कमेंट शेअर केली. खरंच अर्जुन, तुझ्याकडे नेहमी सर्वोत्तम कमेंट्स कशा असतात? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. 


आलियाच्या हॉलिवूड पदार्पणासाठी अर्जुन एकटाच चीअर करत नव्हता. तिची बहीण, पूजा भट्ट हिने देखील कमेंट केली आणि लिहिले, "आयुष्य आता ते शक्य करत आहे जे कधीकाळी अशक्य होते! जग हे तुझ्या खेळाचे मैदान आहे! आणि तू आणखी चमकशील याची आम्हाला खात्री आहे! खूप अभिमान आहे!"

तिची आई सोनी राजदान हिने देखील एक गोड कमेंट लिहिली ज्यामध्ये "जगातील सर्वोत्तम शुभेच्छा तुला आहेत." असे म्हटलेले आहे. रणीबर कपूरसोबत आलिया भट्टने महिन्याभरापूर्वीच लग्न केले आहे. लग्नाला एक महिना उलटून चार दिवसांनी आलिया तिच्या हॉलिवूडच्या शूटिंगसाठी निघाली आहे. आलिया रवाना होण्याआधी रणबीर कपूर आणि आलिया एकत्र डिनर डेटसाठीही गेले होते. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या आंतरराष्ट्रीय स्पाय थ्रिलरमध्ये आलिया भट्ट गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या विरुद्ध भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ब्रिटीश चित्रपट निर्माता टॉम हार्पर दिग्दर्शित करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी