आलिया भट स्वतःच्या घरात झाली शिफ्ट; किंमत तब्बल १३ कोटी रुपये, पाहा तिच्या घराचा [VIDEO]

बी टाऊन
Updated Jul 21, 2019 | 13:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Alia Bhatt new home: आलीया नुकतीच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. गेली दोन वर्षे ती या स्वतःच्या नव्या घराची तयारी करत होती. दोन वर्षांचा प्रवास एका व्हिडिओमध्ये सांगितला आहे. यू-ट्यूबवर तो व्हिडिओ शेअर केलाय.

Alia Bhatt
आलिया भट स्वतःच्या घरात झाली शिफ्ट   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • आलिया भट स्वतःच्या घरात झाली शिफ्ट
  • पाहा आलियाचं हक्काचं घर कसं आहे!
  • तेरा कोटी रुपयांना खरेदी केलं आलियानं नवं घर

Alia Bhatt new Home: आलिया भटनं बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवलाय. ट्विटर, इंस्टाग्रामवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायम अॅक्टिव्ह असणारी ही क्युट अभिनेत्री आता यू-ट्यूबवरही अॅक्टिव्ह झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपलं यू-ट्यूब चॅनेल लॉन्च केलंय. त्यावर मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी फॅन्सशी शेअर करत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये सोशल मीडियावर असा प्रयोग करणारी आलिया ही एकमेव अभिनेत्री आहे. यू-ट्यूब चॅनेल लॉन्च करताना ती म्हणाली, ‘मी आता माझे यू-ट्यूब चॅनेल लाँच करत आहे. मी ट्विटर आणि इंस्टामच्या दुनियेतून आता यू-ट्यूबच्या दुनियेत प्रवेश करत आहे.’

आलीया नुकतीच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. गेली दोन वर्षे ती या स्वतःच्या नव्या घराची तयारी करत होती. पहिल्यांदाच ती आई-वडिलांपासून स्वतःच्या घरात रहायला जात आहे. तिनं या नव्या घरासाठीचा दोन वर्षांचा प्रवास एका व्हिडिओमध्ये सांगितला असून, तो यू-ट्यूबवर शेअरही केला आहे. 

तेरा कोटी रुपयांचं नवं घर

आलिया भटचं नवीन घर हे १३ कोटी रुपयांचं आहे. मुंबईत जुहूमधील एका पॉश एरियात आलियानं नवीन घर घेतलंय. या नव्या फ्लॅटची माहिती ती व्हिडिओमध्ये देत आहे. शुक्रवारी तिनं तिच्या यू-ट्यूब चॅनेलवर आपला मुव्हिंग डे व्हिडिओ शेअर केला. मित्रांनो तुम्ही मला माझ्या नव्या घरात पाहू शकतो इथं शिफ्ट होण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

 

 

आलीयानं आपल्या वडिलांचं घर सोडून स्वतःच्या हिमतीवर मुंबईत घर खरेदी करण्याचा प्रवास या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. ती म्हणाली, ‘आपलं घर सोडण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप विशेष होता. मी पहिल्यांदाच माझ्या घरापासून दूर जात आहे. पहिल्यांदा मी एकटी राहणार होते. पण, नंतर मी माझ्या बहिणीला इथं राहण्यासाठी तयार केलं. आता ती थोडे दिवस या घरात आणि थोडे दिवस आई-वडिलांजवळ राहणार आहे.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Critics Choice Awards 2019 ?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kal Se Kalank ?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

दोन प्रोजेक्टमध्ये आलिया बिझी

आलियाने हा फ्लॅट २०१७मध्ये खरेदी केला होता. ती आपली बहीण शाहीन भट्टसोबत या घरात राहते. सध्या आलिया ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आलिया पहिल्यांदाच आपला बायफ्रेंड रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या सिनेमात आलिया रणबीरसोबत महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यात मौनी रॉय पहिल्यांदाच निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. सिनेमा अयान मुखर्जी डायरेक्ट करत आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, आलिया भट सडक टू या सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शित करून महेश भट पुनरागमन करत आहेत. ते पहिल्यांदाच आलियाचा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. सिनेमात आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट यांच्याही भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
आलिया भट स्वतःच्या घरात झाली शिफ्ट; किंमत तब्बल १३ कोटी रुपये, पाहा तिच्या घराचा [VIDEO] Description: Alia Bhatt new home: आलीया नुकतीच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. गेली दोन वर्षे ती या स्वतःच्या नव्या घराची तयारी करत होती. दोन वर्षांचा प्रवास एका व्हिडिओमध्ये सांगितला आहे. यू-ट्यूबवर तो व्हिडिओ शेअर केलाय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...