असं काय म्हणाला रणबीर की आलियाच्या डोळ्यात आलं पाणी

बी टाऊन
Updated Apr 01, 2019 | 11:35 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Alia bhatt and Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या झी सिने अॅवॉर्डचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात रणबीरचे बोलणे ऐकून आलिया भट्टच्या डोळ्यात पाणी येतं.

alia bhatt and ranbir kapoor
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनचे फेव्हरिट कपल्स झाले आहेत. अनेकदा दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अॅवॉर्ड फंक्शनमध्येही रणबीर आणि आलिया सर्वांसमोर हात पकडून दिसत होते. झी सिने अॅवॉर्ड्समध्ये आलिया आणि रणबीर दोघांनाही अॅवॉर्ड मिळाला. हा अॅवॉर्ड्स शो नुकताच टीव्हीवर ब्रॉडकास्ट झाला. या सोहळ्यात रणबीरला संजू सिनेमासाठी बेस्ट अॅक्टरचा अॅवॉर्ड मिळाला. तर आलियाला व्ह्यूव्हर्स चॉईस बेस्ट अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला. विशेष म्हणजे या सोहळ्यात आलियाने रणबीरला हा अॅवॉर्ड दिला होता.

रणबीरने अॅवॉर्ड घेतल्यानंतर आलियाला मिठी मारली आणि रणबीरने छोटे भाषण दिेले. रणबीरचे हे बोलणे ऐकून आलियाच्या डोळ्यात पाणी आले. याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये रणबीरने सगळ्यांचे आभार मानले. यावेळी त्याने आपल्या वडिलांची आठवण काढली. तसेच त्यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. या दरम्यान, आलिया डोळे पुसताना दिसत होती. आलिया आणि रणबीर कपूर आगामी अयान मुखर्जीचा सिनेमा 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार आहे. पहिल्यांदा हे दोघेही ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होईल. काही दिवसांपूर्वी ड्रोन्सच्या सहाय्याने याचा लोगो रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. 

ब्रम्हास्त्रच्या सेटवर आलिया आणि रणबीर यांचे सूत जुळले होते. दोघांना अनेकदा हँगआऊट करताना पाहिले आहे. दरम्यान, त्यावेळेस दोघांनीही या गोष्टीसाठी नकार दिला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या एका अॅवॉर्ड शोमध्ये आलियाने आपले प्रेम व्यक्त करताना रणबीरला आय लव्ह यूही म्हटले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी