Christmas 2021: आलिया भट्ट-रणबीर कपूरने एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस, कुटुंबासह पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बी टाऊन
Updated Dec 25, 2021 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Christmas 2021: देशभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मग, बॉलिवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनेही कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला.

Alia bhatt and Ranbir kapoor's Christmas celebration
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे ख्रिसमस सेलिब्रेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया-रणबीरचे ख्रिसमस सेलिब्रेशन
  • कुटुंबीयांसोबत केली ख्रिसमस पार्टी
  • आलिया-रणबीर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये प्रमुख भूमिकेत


Bollywood Christmas celebration : देशभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मग, बॉलिवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनेही कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला. अलीकडेच अभिनेता रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरसोबत अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन भट्ट हिच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेशन केले.

या गेट-टूगेदरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नीतू कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, रणबीर कपूर देखील पांढरा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.  

आलियाची बहीण शाहीनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये आलिया भट्ट स्ट्रॅपलेस लाल ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी तिची बहीण शाहीन ग्रीन आणि आई सोनी राजदान क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याचदा फॅमिली गेट-टूगेदर करत असतात. आलिया आणि रणबीर कपूर लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत.

सायंटिफिक ट्रायोलॉजीवर आधारित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाचं दिग्दर्शनअयान मुखर्जीचं असून पुढील वर्षी 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Brahmastra': Fans are unimpressed with Ranbir Kapoor and Alia Bhatt's  on-stage chemistry, say 'so much awkwardness' | Hindi Movie News - Times of  India

दुसरीकडे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. मात्र, आता आलिया आणि रणबीरने 2022 मध्ये लग्न करण्याचं ठरवलं आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी