Ranbir Kapoor and Alia Bhatt Honeymoon Destination: बॉलिवूड कलाकार आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूर ( Ranbir kapoor ) १५ किंवा १६ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. 2022 मधील हे सर्वात मोठे बॉलिवूड लग्न असेल. 13-16 पर्यंत लग्नाचे कार्यक्रम ठरले आहेत. या भव्य लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. या लग्नाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. लग्नानंतर हनीमूनसाठी हे जोडपे कुठे जाणार याचीच चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही दक्षिण आफ्रिकेत हनीमूनसाठी जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी आलिया आणि रणबीर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दोघांनी आफ्रिकेत सफारीचा आनंद लुटला होता. दोघांनीही हे ठिकाण पुन्हा एकदा एक्सप्लोर करण्याचे ठरवले असल्याचं समजतंय आणि तेही त्याच्या हनिमूनला. रणबीर आणि आलिया या दोघांनी त्यांच्या हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला जाण्याची योजना आखली आहे, असे या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. नवीन वर्षाचा आनंद लुटल्यानंतर या जोडप्याला पुन्हा सफारीचा आनंद लुटण्याची इच्छा आहे.
रणबीर कपूर आलिया भट्टसोबतच्या लग्नानंतर काही दिवसांनी संदीप वंगा यांच्या 'अॅनिमल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, रणबीर कपूरही श्रद्धा कपूरसोबत लव रंजनच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटासाठी शूट करणार आहे.
त्याचवेळी आलिया भट्टबद्दल बोलायचे झाले तर ती अमेरिकेला जाणार आहे. खरे तर आलिया भट्ट लग्नानंतर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया भट्ट लवकरच 'वंडर वुमन' फेम गॅल गडॉटसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' असं या सिनेमाचं नाव आहे. याशिवाय आलिया भट्टकडे करण जोहरचा चित्रपट 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा', ज्यामध्ये ती रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी असणार आहेत