Alia Bhatt च्या बेबी बंपचे फोटो लीक, एप्रिल महिन्यात झालं होतं लग्न

Alia Bhatt baby bump: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गर्भवती (Pregnant)असून लवकरच आई होणार आहे. आलिया सतत तिच्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. आता तिचा नवीन फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे.

alia bhatts baby bump spotted leaked photo from sets of rocky and rani love story movie
Alia Bhatt च्या बेबी बंपचे फोटो झाले लीक 
थोडं पण कामाचं
  • आलिया भट्टच्या बेबी बंपचा फोटो व्हायरल
  • 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरून आलिया भट्टचा नवा फोटो आला समोर
  • आलिया आणि रणबीरने याच वर्षी एप्रिल महिन्यात केलं होतं लग्न

Alia Bhatt Pregnant: मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-बाबा होणार आहेत. आलियाने गेल्या महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया गरोदर असली तरी ती तिचे प्रोजेक्ट्स पूर्ण करत आहे. नुकताच तिचा नवीन फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तिचा बेबी बंप ( baby bump) दिसत आहे. (alia bhatts baby bump spotted leaked photo from sets of rocky and rani love story movie)

आलिया भट्टचा नवा फोटो आला समोर

अलीकडेच तिचा हॉलिवूड प्रोजेक्ट 'द हार्ट ऑफ स्टोन' पूर्ण करून आलिया मायदेशी परतली होती. आता तिने तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. ETimes ने आलियाचा एक नवीन फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. आलियाचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

अधिक वाचा: Prajakta mali instagram : 'या' कारणानं बोल्ड आणि बेधडक भूमिकेमुळे पुन्हा एकदा प्राजक्ता माळी ट्रोल

आलियाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर रणवीर-आलियाशिवाय जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

चाहत्यांना दिलेली गोड बातमी

आलियाने गेल्या महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर असल्याची दिसून आली होती. यावेळी ती हसत होत तर रणबीर तिच्या शेजारी बसला होता. दोघंही पडद्यावर सोनोग्राफी होत असलेली पाहत होते. त्यांनी स्क्रीनवर हार्ट इमोजी लावला होता. हा फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहललेलं, 'आमचे बाळ... लवकरच येत आहे.' यासोबतच आलियाने आणखी एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये सिंह आणि सिंहिणी त्यांच्या मुलासोबत दिसत होते.

अधिक वाचा: Anupama weight gain : वाढलेल्या वजनामुळे अनुपमानेही ऐकले होते शेजाऱ्यांचे टोमणे:86 किलो होते रुपाली गांगुलीचे वजन

एप्रिल महिन्यात झाले होते लग्न

आलिया आणि रणबीर यांचा विवाह यावर्षी 14 एप्रिल रोजी रणबीरच्या वांद्रे येथील घरी पार पडलं होतं. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अशी माहिती आहे की, रणबीर आणि आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट रिलीज होणार आहे. ज्यामध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट 09 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी