Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडमध्येच जणू काही उत्साहाचं वातावरण आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे चाहते त्यांच्या आवडत्या बी-टाऊन जोडप्याला लग्नाच्या बंधनात बांधताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर आणि आई नीतू कपूर यांनी या जोडप्याच्या लग्नाची तारीख उघड केली होती.नीतू कपूरने तिची सून आलिया भट्टचे कौतुक केले होते. रिद्धिमा कपूरनेही आलिया खूप गोड आणि क्यूट असल्याचं म्हटलं होतं रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्नाआधीचे फंक्शन काल म्हणजेच १३ एप्रिलला सुरू झाले. नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत. नीतू कपूरचे हे फोटो पाहून तिचे चाहते भावूक झाले आहेत
रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मेहेदी सोहळ्याचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.या फोटोमध्ये नीतू कपूर तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहे. पण एका गोष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नीतू कपूरने शेअर केलेल्या मेहेंदी फोटोमध्ये तिने तिच्या हातावर दिवंगत पती ऋषी कपूर यांचे नाव लिहिलेले दिसत आहे. नीतू कपूरने शेअर केलेला हा फोटो पाहून त्यांचे चाहते भावूक झाले.
यासोबत नीतू कपूरने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या डान्स क्रूसोबत दिसत आहे. नीतू कपूरच्या डान्स क्रुमध्ये तिच्यासोबत करिश्मा कपूर, रीमा जैन, नताशा नंदा आणि इतर अनेकजण दिसत आहेत.
रिद्धिमा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा मेहंदीचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिद्धिमाने आपल्या हातावर अरेबी मेहंदीचे डिझाईन बनवलेले दिसत आहे. यासोबत तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे. हा फोटो शेअर करत रिद्धिमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेरे भाई की वेडिंग' यासोबतच तिने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आउटफिट कॅरी केल्याचेही सांगितले.
करिश्मा कपूरने आलिया-रणबीरच्या मेहेंदीचे फोटो सर्वात आधी सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब आनंदात दिसत होते.