Alia Ranbir Wedding: आलिया भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडवर KRK चा निशाणा, म्हणाला - 'तुला साधं लग्नाचं आमंत्रणही दिलं नाही

बी टाऊन
Updated Apr 14, 2022 | 15:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Ranbir Wedding । बॉलिवूडचे क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हे जोडपे दुपारी २-३ वाजता लग्नाचे फेरे घेऊ शकते.

Alia Ranbir Wedding KRK targets Alia Bhatt's ex-boyfriend 
आलिया भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडवर KRK चा निशाणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडचे क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
  • दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे.
  • कमाल आर खान यांनी आलियाच्या लग्नाबद्दल सिद्धार्थ मल्होत्राची खिल्ली उडवली आहे.

Alia Ranbir Wedding । मुंबई : बॉलिवूडचे क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हे जोडपे दुपारी २-३ वाजता लग्नाचे फेरे घेऊ शकते. दोघेही लग्नबंधनात अडकण्यासाठी आता काही क्षण बाकी आहेत. याच दरम्यान आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा ​​प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. (Alia Ranbir Wedding KRK targets Alia Bhatt's ex-boyfriend). 

खर तर चित्रपट समीक्षक कमाल आर खान यांनी आलियाच्या लग्नाबद्दल सिद्धार्थ मल्होत्राची खिल्ली उडवली आहे आणि त्याला खडे बोल सुनावले आहेत. केआरकेने ट्विट करून लिहिले की, “एकदा #SidhartMalhotra माझ्याशी #AliaBhatt साठी भांडला होता. आता आलियाने त्याला लग्नासाठी देखील आमंत्रण दिले नाही. बरोबर समजले बेटा. धोबी का कुट्टा घर का ना घाट का." अशा शब्दांत केआरकेने सिद्धार्थची खिल्ली उडवली. 

अधिक वाचा : लग्नसराईत सोन्याच्या भावात येणार मोठी तेजी, लवकर करा खरेदी

एवढेच नाही तर केआरकेने आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे निमंत्रण न दिल्याने सलमान खानचीही खरडपट्टी काढली. तो म्हणाला, “प्रिय रणबीर-आलिया, जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी बुद्धूला आमंत्रित करत नसाल तर ते चुकीचे आहे. अरे त्याचे स्वतःचे लग्न नाही होत, बिचाऱ्याला येऊ तरी द्या. 

अधिक वाचा : PM मोदींनी केले पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन

आलिया आणि सिद्धार्थने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून एकत्र पदार्पण केले आणि नंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २०१६-१७ च्या सुमारास ही जोडी वेगळी झाली. नंतर आलियाने रणबीरला डेट करायला सुरुवात केली आणि सिद्धार्थ कियारा अडवाणीसोबत गेला. जेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा त्यांनी भारताच्या वोग मासिकाच्या मुखपृष्ठासाठी एकत्र फोटोशूट केले होते. त्यावेळी कमाल आर खानने आलियावर अपमानास्पद आणि अपमानजनक टिप्पणी केली होती आणि सिद्धार्थने त्याला त्यावेळी प्रत्युत्तर दिले होते. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न वास्तू अपार्टमेंटमध्ये होणार आहे. जिथे रणबीरचे आई-वडील आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची लग्नगाठ बांधली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी