Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : आलियाला रणबीरसोबत स्वयंवर रचायचा होता, अनेकवेळा व्यक्त केली लग्नाची इच्छा

बी टाऊन
Updated Apr 11, 2022 | 17:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. दोघांची क्युट केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, रणबीरचा आपल्या स्वयंवराचा हिस्सा व्हावा अशी आलियाची इच्छा होती. तिला स्वयंवर रचायचा होता.

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding
आलियाला रचायचं होतं स्वयंवर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकणार
  • आलियाला रणबीरसोबत स्वयंवर रचायचं होतं
  • आलिया-रणबीरची सिझलिंग केमिस्ट्री

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : 'तुझमें रब दिखाता है, यारा मै क्या करू? ' रणबीर कपूरसाठी आलिया भट्टचं प्रेम पाहून हेच गाणं आठवतं. आलियाने रणबीरवरचे तिचे प्रेम जगजाहीर केले आहे. जेव्हा जेव्हा रणबीरचा विचार येतो तेव्हा आलियाचा चेहरा आनंदाने फुलतो. कधीकधी रणबीरचे नाव ऐकून ती लाजायला लागते. आलियाने अनेकवेळा रणबीरवर आपले प्रेम व्यक्त केले आहे.

अधिक वाचा : Hanuman jayanti 2022:हनुमान जयंतीला जरूर करा हे उपाय

रणबीरवर आलियाचं खूप प्रेम आहे. 

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही आलियाने रणबीरला बेस्ट बॉयफ्रेंड आणि एक अप्रतिम श्रोता असे वर्णन केले होते. गेल्या काही वर्षांपूर्वीही रणबीर आलियाचा आवडता आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये आलियाने रणबीरने तिच्या स्वयंवरमध्ये सहभागी व्हावे अशी तिची इच्छा व्यक्त केली होती. 

कॉफी विथ करण या शोच्या एका भागादरम्यान, करण जोहरने आलिया भट्टला विचारले – जर बॉलिवूडमध्ये तुझं स्वयंवर रचलं, तर तुला कोणाला पाहायला आवडेल? 
या प्रश्नाच्या उत्तरासाठी विचार न करता आलियाने एका क्षणात रणबीरचे नाव घेतले होते. आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आलिया रणबीरबद्दल किती पॅशनेट आहे.  आलिया भट्टनेही अनेकवेळा रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा : ऑनलाइन गेमिंगमध्ये केवायसी होऊ शकते बंधनकारक

आता अखेर आलियाचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आलिया तिच्या ड्रीम बॉय रणबीरची वधू बनणार आहे. दोन्ही कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे. आलिया तिच्या प्रिय रणबीरसोबत सात फेरे कधी घेणार या खास क्षणाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी