Allu Arjun Hook Step Copied : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाण्यांपासून ते प्रत्येक डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. प्रत्येकजण त्याच्या हुक स्टेपची कॉपी करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की ज्या हुक स्टेपमुळे अभिनेत्याचे खूप कौतुक होत आहे, ती हुक स्टेप अल्लू अर्जुनने कॉपी केली आहे. होय, साई पल्लवीने (Sai Pallavi) याआधी ही प्रसिद्ध हुकस्टेप शूट केली आहे.
अल्लू अर्जुनच्या आधी, सई पल्लवीने मोठ्या पडद्यावर हा हाताचा हावभाव केला आहे. साई पल्लवीने 'राउडी बेबी' गाण्यात हाताच्या हावभावाची स्टेप केली होती. या गाण्यात साई पल्लवी धनुषसोबत (Dhanush) जबरदस्त डान्स करताना दिसली. हे गाणेही प्रचंड हिट ठरले.
अल्लू अर्जुनने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, या स्टेपमध्ये तो एका गाण्यात परफॉर्म करताना दिसणार आहे. पण दिग्दर्शक सुकुमारला त्याची स्टाइल इतकी आवडली की त्याने ही पुष्पासोबत जोडली. आणि जेव्हाही पुष्पा कोणताही डायलॉग रिक्रिएट करतो तेव्हा ही हुक स्टेप करायला विसरत नाही. प्रेक्षकांमध्ये पुष्पाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
पुष्पा चित्रपट रिलीज होऊन एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत. मात्र, असे दिसते की दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता आणि चर्चा वाढतच आहे. पुष्पाचे डायलॉग्स आणि स्टेप्स सगळ्यांच्याच तोंडी आहेत. अशा परिस्थितीत पुष्पाच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच थोडी धक्कादायक असेल.