Pushpa: अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाला पुष्पा सिनेमाला या 5 कलाकारांनी नाकारलं होतं.

बी टाऊन
Updated Jan 29, 2022 | 16:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa The Rise update : महेश बाबूपासून ते दिशा पटानीपर्यंत या कलाकारांनी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटाची ऑफर नाकारली.

 Pushpa movie was rejected by these 5 actors
पुष्पा सिनेमाला 5 कलाकारांनी नाकारलं होतं.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुष्पा सिनेमासाठी 5 कलाकारांनी नकार दिला होता
  • महेश बाबूपासून दिशा पटानीपर्यंत यांनी ऑफर नाकारली.
  • पुष्पा सिनेमाची सुपरहिट वाटचाल

Pushpa The Rise update : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा' गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये आला होता, तेव्हापासून तो देशभरात धुमाकूळ घालत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाला देशातील अनेक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील सर्वच पात्रांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. 
पण तुम्हाला माहित आहे का की महेश बाबूपासून दिशा पटानीपर्यंत या 5 कलाकारांनी 'पुष्पा'मध्ये मुख्य भूमिका करण्यास नकार दिला होता. 

या कलाकारांनी नाकारला होता 'पुष्पा' चित्रपट


महेश बाबू (Mahesh Babu)

रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या आधी दिग्दर्शक सुकुमारने पुष्पाची स्क्रिप्ट महेश बाबूला सांगितली होती. मात्र, महेश मेकओव्हर करून पडद्यावर नकारात्मक भूमिका करायला तयार नव्हता.

Is Mahesh Babu prepping up for a long break after Sarileru Neekevvaru? | Telugu Movie News - Times of India

दिशा पाटनी (Disha Patani)

'ऊ अंतवा' या गाण्यासाठी दिशा पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे. या गाण्यासाठी निर्माते त्यांच्या निवडीसाठी पैसे खर्च करण्यास तयार होते. मात्र, विविध कारणांमुळे तिने ही ऑफर नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

5 reasons why Disha Patani is a gem to watch in 'Bharat' | Hindi Movie News - Times of India


सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)


रिपोर्ट्सनुसार, सामंथाला सुरुवातीला श्रीवल्लीची भूमिका ऑफर करण्यात आली होती.  मात्र, अनेक कारणांमुळे चित्रपटातील मुख्य भूमिका नाकारण्यात आली. नंतर ही भूमिका रश्मिका मंदान्नाकडे गेली. समंथाने या चित्रपटात एक आयटम नंबर केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Samantha Ruth Prabhu gets unexpected support from Kolkata amid 'Pushpa' item song 'O Antava' controversy | The Times of India


नोरा फतेही (Nora Fatehi)

नोरा फतेहीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी नोराला ऊ अंतवा गाण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, नोराने त्याचा एक भाग होण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती.

Nora Fatehi: Did you know Nora Fatehi has worked in Malayalam films? | Malayalam Movie News - Times of India


विजय सेतुपति (Vijay Sethupathi)

विजय सेतुपती यांना प्रथम फहद फासिलने साकारलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याच्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, तारखा नसल्यामुळे विजयने ऑफर नाकारली.

Vijay Sethupathi begins shooting for 'Thalapathy64'! | Tamil Movie News - Times of India

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी