Ala Vaikunthapurramuloo will release on Television : पुष्पा : द राइज (Pushpa: The Rise) या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्टायलिश अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna)यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील गाण्यांपासून ते संवादांपर्यंत ते सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनचा 'आला वैकुंठपुरमुलू' (Ala Vaikunthapurramuloo)हा चित्रपट हिंदीत रिलीज करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र हा सिनेमा, थिएटरमध्ये रिलीज होणार नसल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे चाहत्यांचा थोडासा हिरमोड झाला.
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांना आता हा सिनेमा घरात बसून पाहता येणार आहे.
गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सने एक ट्विट केले आहे.या ट्विटमध्ये "अला वैकुंठपुरमलो" चे अपडेट आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'अला वैकुंठपुरमलो (हिंदी) थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, चाहत्यांचे प्रेम लक्षात घेऊन हा चित्रपट 6 फेब्रुवारीला 'धिंचक टीव्ही'वर रिलीज होणार आहे. " हे ट्विट समोर आल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत.
अल्लू अर्जुनचा मेगा हिट चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो' ची हिंदी आवृत्ती २६ जानेवारीला रिलीज होणार होती. मात्र आता त्याबाबत अपडेट आले आहे. गोल्डमाइन्स टेलिफिल्मच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. गोल्डमाइन्सचे प्रवर्तक मनीष शाह आणि शहजादाच्या निर्मात्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की 'अला वैकुंठपुरमलो' ची हिंदी आवृत्ती थिएटरमध्ये रिलीज केली जाणार नाही. या निर्णयाबद्दल शहजादा मेकर्स मनीष शहा यांचे आभार मानत आहेत.
अला वैकुंठापुरामुलू, जो सध्या नेटफ्लिक्सवर आहे, हा २०२० मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. अभिनेत्याचा पुष्पा हा चित्रपट सुपरडुपर हिट असल्याने,
निर्मात्यांनी अला वैकुंठापुरामुलू हिंदीमध्ये रिलीज करण्याची योजना आखली होती. परंतु आता हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून टीव्हीवर या सिनेमाचा प्रीमियर होईल.