Allu Arjun Luxurious Car Collection: अल्लू अर्जुनचे कार कलेक्शन एकापेक्षा एक सरस आहे. अनेका महागड्या कार अल्लू अर्जुनच्या ताफ्यात आहे. अल्लू अर्जुनकडे ब्लॅक रेंज रोव्हर आहे ज्याची किंमत 2019 मध्ये 2.5 ते 4 कोटी रुपये होती.
लक्झरी वाहनांच्या यादीत अल्लू अर्जुनकडे Hummer H2 देखील आहे. या वाहनाची किंमत सुमारे ७५ लाख रुपये आहे.
Volvo XC90 T8 Excellence देखील या यादीचा एक भाग आहे. या कारचे सध्याचे बाजारमूल्य 1 कोटी 30 लाख रुपये आहे.
अल्लू अर्जुनच्या कार कलेक्शनमध्ये Jaguar XJL सारख्या महागड्या वाहनाचाही समावेश आहे. त्याच्या बाजारमूल्याबद्दल सांगायचे झाले तर त्याची किंमत 1 कोटींहून अधिक आहे.
अल्लू अर्जुनने 2019 मध्ये व्हॅनिटी व्हॅन घेतली होती, ज्याचे नाव त्याने 'द फाल्कन' ठेवले होते. अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन राजवाड्यापेक्षा कमी नाही, या व्हॅनिटीची किंमत 7 कोटी रुपये आहे.
केवळ कारच नाही तर अल्लूकडे खाजगी जेट देखील आहे, ज्यामध्ये त्याने प्रवास करताना आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अल्लूने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी (Sneha Reddy) लग्न केले. हे हाय प्रोफाईल लग्न सर्वात महागडे सेलिब्रिटी लग्नांपैकी एक मानले जाते.