Pushpa Box office Collection Day 1 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग, पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई

बी टाऊन
Updated Dec 19, 2021 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa Box office collection : अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. सर्वांच्या नजरा आरआरआर चित्रपटावर खिळल्या होत्या, पण त्याआधी पुष्पा सिनेमा रिलीज झाला आणि त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली.

Allu Arjun's film has a huge opening, earning Rs 50 crore on its first day
अल्लू अर्जुन छा गया, पुष्पा सिनेमाला जबरदस्त ओपनिंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अल्लू अर्जुनचा अप्रतिम चित्रपट
  • पहिल्या दिवसाचे कलेक्शन जवळपास 50 कोटी
  • 'पुष्पा' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती


Pushpa Box office Collection Day 1 : मुंबई : कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही मात्र थिएटर सुरू झाली आहेत. एकापाठोपाठ एक मोठे सिनेमा रिलीज होत आहेत.बॉलिवूडसाठी बॉक्स ऑफिसवर आव्हानं वाढत आहेत. याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले म्हणजे कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत अनेक ठिकाणी थिएटर्समध्ये अर्ध्या क्षमतेने प्रेक्षकांना बसवले जात आहे आणि दुसरे म्हणजे यावेळी बॉलीवूडसोबतच साऊथ आणि हॉलिवूडचे चित्रपटही रिलीज होत आहेत. आता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नुकताच रिलीज झालेला 'Pushpa:The Rise' चित्रपट घ्या. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आरआरआर या चित्रपटावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, मात्र त्याआधीच  'Pushpa:The Rise'चित्रपटाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे. 

सिनेमाने प्रचंड कमाई केली 

हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी रिलीज झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या एकूण कमाईने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. पुष्पाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तामिळनाडूमध्ये 4.06 कोटींची कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या 83 मुळे तो थोडा आधी रिलीज झाला. रिपोर्ट्सनुसार, तेलंगणामध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आतापर्यंत असं कधीच घडलेलं नाही.


रश्मिका-अल्लू अर्जुनची जोडी 

पुष्पा द राईजचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे, तर दुसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. हा चित्रपट लाल चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसोबत फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी