मुंबई : सुकुमार (Sukumar) यांनी दिग्दर्शित (Directed) केलेला 'पुष्पा: द राइज' ('Pushpa: The Rise')हा चित्रपट (movie)बॉक्स ऑफिसवर (box office) जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाने अल्लू अर्जुनला (Allu Arjun) नवीन ओळख दिली. या चित्रपटात 'ऊं अंटावा' आणि 'श्रीवल्ली' यासारखी सुपरहिट गाण्यासह अनेक असे डायलॉग दिले आहेत जे आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. 'पुष्पा झुकेगा नहीं'आणि 'फ्लावर नहीं, फायर है मैं।' हे डायलॉग ( dialogue) अनेकांना पाठ झाली आहेत. पण वाचक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? मात्र मूळ तेलुगू चित्रपटात हे डायलॉग नव्हतेचं. खरं वाटत नाहीये ना , पण याचा खुलासा खुद्द हिंदी आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने केला आहे. (Allu Arjun's 'Pushpa Zukega Nahi Sala' dialogue was not in the Telugu film; Why was the dialogue changed?)
अधिक वाचा : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल
श्रेयस तळपदेने दिलेल्या माहितीनुसार, हे डायलॉग हिंदीमध्ये डब करताना बनवण्यात आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे. डबिंग करताना मूळ संवादात खूप बदल आणि सुधारणा करण्यात आली होती,असं श्रेयस म्हणाला.
अधिक वाचा : पिवळी साडी नेसून भोजपुरी अभिनेत्रींने लावली आग
आपल्या मुलाखतीत बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला की, या चित्रपटाचे डबिंग करताना प्रत्येक शब्दाचे भाषांतर करण्यात आले नव्हते. अल्लू अर्जुनचा मूळ डायलॉग हा 'पुष्पा जाएगा नहीं' हा होता. परंतु याचे फक्त शाब्दिक भाषांतर न करताना त्याला अधिक प्रभावी बनविण्यासाठी 'पुष्पा झुकेगा नहीं' असा बनवण्यात आला. त्यानंतर हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे.
अधिक वाचा : माधुरी दीक्षित नेनेच्या सुंदर लेहेंगा लूकचे क्या कहने
'फ्लावर नहीं, फायर है मै' हा आयकॉनिक डायलॉग देखील मूळ चित्रपटात नव्हता. डबिंग करताना आम्ही बदल केले जेणेकरुन वर्ष झालं तरी लोकांच्या ओठांवरती पात्राचे संवाद कायम राहतील. पण शाब्दिक भाषांतर केले असते तर हे संवाद कदाचित कोणच्या लक्षात राहिले नसते, असं श्रेयस तळपदे म्हणाला.