Allu Arjun New Look : हातात सिगार, डोळ्यांवर गाॅगल, स्टायलिश हेअरस्टाईलमधला Pushpa २ ची झलक

Allu Arjun New Look From Pushpa 2: अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो स्टायलिश हेअरस्टाइल, हातात सिगार आणि डोळ्यांवर चष्मा घातलेला दिसत आहे. तर अल्लूने चाहत्यांना पुष्पा 2 ची पहिली झलक दिली आहे का?

Allu Arjun's stunning look revealed from Pushpa 2! Seeing cigar in hand, glasses on eyes, stylish hairstyle
Allu Arjun New Look : हातात सिगार, डोळ्यांवर गाॅगल, स्टायलिश हेअरस्टाईलमधला Pushpa २ चा लुक ।  
थोडं पण कामाचं
  • पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा नवा लूक:
  • अल्लू अर्जुनने ही पोस्ट शेअर केली
  • फोटो पाहून चाहते म्हणाले- 'स्टाईल इज बॉस'

Allu Arjun in pushpa 2 : गेल्या वर्षी पुष्पा पेक्षा मोठा धमाका करणारा अल्लू अर्जुन आता पुष्पा 2 मुळे खूप चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी अल्लू अर्जुनच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टने ही उत्सुकता वाढवण्याचे काम केले आहे. ज्याला पाहून असे वाटते की, त्याच्या आगामी 'पुष्पा २' या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा हा लूक असावा. अल्लू अर्जुनने ही पोस्ट शेअर करताना सांगितले की, यावेळी डबल फायर होणार आहे. हातात सिगार, गडद चष्मा, स्टायलिश केस आणि लेदर जॅकेटमध्ये अल्लू अर्जुन पाहून चाहते हैराण झाले आहेत. (Allu Arjun's stunning look revealed from Pushpa 2! Seeing cigar in hand, glasses on eyes, stylish hairstyle)

अधिक वाचा :सलमानने वाढवली आपली सुरक्षा, कारही केली अपग्रेड

पुष्पा भाग १ मध्ये अल्लू अर्जुन त्याच्या नावाचा डंका वाजवतो आणि तस्करांचा डाॅन कसा बनतो हे दाखवण्यात आले होते. आता साम्राज्य राखण्याचे हे आव्हान पुष्पा भाग २ मध्ये दाखवले जाईल म्हणजेच आव्हान मोठे असेल पण पुष्पा झुकणार नाही. अल्लू अर्जुनने जेव्हापासून हा फोटो शेअर केला आहे, तेव्हापासून त्यावर कमेंट्सचा महापूर येऊ लागला आहे. काही युजर्स म्हणत आहेत – स्टाईल बॉस आहे आणि काही अल्लू अर्जुनला पॅन इंडियाचा स्टार बनण्यास सांगत आहेत.

अधिक वाचा : Ranveer Singh Nude photoshoot : रणवीर सिंगच्या Nude फोटोशूटवर 'या'अभिनेत्रीची धक्कादायक प्रतिक्रिया, "म्हणाली, मीही तेच करेन..."

दरम्यान, असे म्हटले जात आहे की हा फोटो एका अॅड शूट दरम्यान काढला गेला आहे, तर चाहते पुष्पा द रुल्स मधून त्याची पहिली झलक सांगत आहेत. सध्या अल्लू अर्जुन पुष्पा 2 चे शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर लवकरच तो रिलीज होणार आहे. पुढच्या वर्षीच तो रिलीज होऊ शकतो, अशी माहिती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी