Amar Singh Jaya Prada: जयाप्रदा यांना आत्महत्या करावीशी वाटली होती

Amar Singh Death: राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा आणि अमर सिंह यांच्या जवळकी असल्याची खूप चर्चा झाली होती. जयाप्रदा अमर सिंह यांच्याशी संबंधांवर मुलाखतीत उघडपणे बोलल्या.

amar singh death when jaya prada wants to commit suicide due to fake viral photo with amar singh
जयाप्रदा यांना आत्महत्या करावीशी वाटली होती  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अमर सिंह यांचे ६४ वर्षी झाले निधन 
  • अभिनेत्री जयाप्रदा अमर सिंह यांना आपला गॉडफादर मानत होत्या
  • जयाप्रदा आणि अमर सिंह यांच्या जवळीकता चर्चाचा विषय बनला होता 

मुंबई :   राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन झाले आहे.  ६४ वर्षीय अमर सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून किडनीसंदर्भातील अनेक आजारांशी लढत होते. अमर सिंह यांची अनेक बॉलिवूड सेलेब्रेटिशीं जवळीकता होती. अभिनेत्री जयाप्रदा या अमर सिंह यांना राजकारणातील आपला गॉडफादर मानत होत्या. 

जयाप्रदा आणि अमर सिंह यांच्या संबंधाबाबत बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. जयाप्रदा यांनी तेलगु देसम पार्टी (टीडीपी) मधून १९९४ मध्ये आपल्या पॉलिटीकल करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष जॉइन केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial) on

जयाप्रदा यांना सपमध्ये आणण्याची श्रेय अमर सिंह यांना जाते. त्यानंतर अमर सिंह आणि जयाप्रदा यांच्या जवळकतेच्या चर्चा झडू लागल्या. जयाप्रदा यांनी इतपर्यंत सांगितले होते की अशा प्रकारच्या बातम्यांनंतर त्या आत्महत्या करणार होत्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial) on

चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला फोटो 

जयाप्रदा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या आयुष्यात अनेकांना मला मदत केली आहे. अमर सिंह हे माझे गॉडफादर आहेत. अमर सिंह डायलेसिसवर होते आणि त्यांच्यासोबत माझे फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आले होते.  

मी धक्क्यात होती. मला आत्महत्या करायची होती. आपल्या सफाईत जयाप्रदा म्हणाल्या होत्या की जर मी अमर सिंह यांना राखी देखील बांधली तरी लोक मागून बोलणे बंद करणार आहेत. लोक काय म्हणतात याची मी काळजी करत नाही. 

असे होते अमर सिंह यांचे कुटुंब 

अमर सिंह यांनी १९८७ मध्ये पंकजा कुमारी यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या १४ वर्षांनंतर २००१मध्ये त्यांना जुळ्या मुली झाल्या. दृष्टी आणि दिशा असे त्या मुलींचे नावे होते. अमर सिंह यांच्या मुली संध्या शिक्षण घेत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांना श्रद्धांजली देताना ट्विट केले की, अमर सिंह जी खूप उर्जावान व्यक्ती होते. गेल्या काही दशकात त्यांच्या राजकीय घटनाक्रमांना खूप जवळून पाहिले आहे. सर्व पक्षांमध्ये आपले मित्र बनविण्यासाठी ओळखले जात होते. मी त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःखी झालो आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी