'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर लाँच

मनोज बाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेल्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर लाँच झाला. ही वेबसीरिज 'द फॅमिली मॅन २' या नावाने ४ जून २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम'वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

The Family Man Season 2
'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर लाँच 
थोडं पण कामाचं
  • 'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर लाँच
  • मनोज बाजपेयी याची प्रमुख भूमिका
  • वेबसीरिज 'द फॅमिली मॅन २' या नावाने ४ जून २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम'वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार

मुंबईः मनोज बाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेल्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर लाँच झाला. ही वेबसीरिज 'द फॅमिली मॅन २' या नावाने ४ जून २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम'वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Amazon Prime Video presents the Official Trailer of The Family Man Season 2

'द फॅमिली मॅन २' ही वेबसीरिज आधी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी लाँच होणार होती. मात्र 'तांडव' या वेबसीरिजवरुन वाद झाल्यामुळे 'द फॅमिली मॅन २'चे लाँचिंग लांबणीवर पडले होते. अखेर ४ जून २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम'वर 'द फॅमिली मॅन २' लाँच होणार आहे. या थ्रीलरमध्ये नऊ भाग (एपिसोड) आहेत. यात श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारणारा मनोज बाजपेयी मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आहे. तो कौटुंबिक जबाबदारी सांभाळत जागतिक दर्जाचा गुप्तहेर म्हणून काम करताना वेबसीरिजमध्ये दिसेल. सामंथा अक्कीनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी 'द फॅमिली मॅन २' विषयी प्रतिक्रिया दिली. 'आमची पात्र भारतात घरोघरी लोकप्रिय होत आहेत. फॅमिली मॅन श्रीकांत तिवारी याला मिळणारे प्रेम, प्रशंसा आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. उत्तम, वास्तववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्याच्या आमच्या विश्वासाला दृढ करत आहेत. 'द फॅमिली मॅन २' हा सीझन आधीच्या सीझनपेक्षा आणखी रोमांचक, जटिल, अॅक्शनपॅक्ड आहे. प्रेक्षकांना हा सीझन आवडेल असा विश्वास वाटत आहे;' असे अपर्णा पुरोहित म्हणाल्या. 

निर्माते राज आणि डीके यांनीही प्रतिक्रिया दिली. 'निर्माते म्हणून 'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर लाँच होण्याची वाट आम्ही बघत होतो. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे. नव्या चेहऱ्याच्या रुपात संकट येत आहे. सामंथा अक्कीनेनीने राजीची छान केली आहे. आमची संपूर्ण टीम प्रतिभावान कलाकारांची आहे;' असे निर्माते राज आणि डीके म्हणाले.

'द फॅमिली मॅन २'मधून वेबसीरिजच्या विश्वात दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा अक्कीनेनी पदार्पण करत आहे. मनोज बाजपेयी, प्रियामणी, शरिब हाश्मी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर 'द फॅमिली मॅन २'मध्ये दिसतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी