अभिनेत्री अमीषा पटेल अडचणीत, न्यायालयाकडून अटक वॉरंट

बी टाऊन
Updated Oct 12, 2019 | 20:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Ameesha Patel: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल अडचणीत आली आहे. अभिनेत्री अमीषा पटेल विरुद्ध रांची न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. 

Ameesha Patel
अभिनेत्री अमीषा पटेल  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री अमीषा पटेल अडचणीत
  • रांची न्यायालयाचं अमीषा पटेल विरुद्ध अटक वॉरंट 
  • चेक बाउंस प्रकरणी अमीषा पटेल विरुद्द अटक वॉरंट 
  • २०१८ सालचं चेक बाउंस प्रकरण

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल विरुद्ध झारखंडमधील रांची न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. चेक बाउंस झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हे अटक वॉरंट काढलं आहे. अटक वॉरंटमुळे रांची पोलीस अभिनेत्री अमीषा पटेलच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. अभिनेत्री अमीषा पटेलला अटक होण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lost in some lovely thoughts ????

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

अभिनेत्री अमीषा पटेल विरुद्ध ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट कुमार विपूल यांनी हे अटक वॉरंट काढलं आहे. त्यानंतर अमीषा पटेलला अटक करण्यासाठी रांची पोलीस मुंबईसाठी रवाना झाले आहेत. अभिनेत्री अमीषा पटेल सध्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आहे. न्यायालयाने यापूर्वी अमीषा पटेलला एक समन्स पाठवला होता आणि ८ जुलैपर्यंत आपली माजू मांडण्यास सांगितलं होतं. मात्र, अभिनेत्री अमीषा पटेल हिच्याकडून या संदर्भात कुठलंही उत्तर मिळालं नाही. न्यायालयाने या प्रकरणी तक्रारदार अजय कुमार सिंह याचा जबाब नोंदवला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध दाखल करण्यात आलेलं हे प्रकरण २०१८ सालचं आहे. अमीषावर अजय कुमार सिंह यांनी सिनेमाच्या नावावर अडीच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप लावला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमीषा पटेलने 'देसी मॅजिक' या सिनेमासाठी अजय कुमार सिंह यांच्याकडून अडीच कोटी रुपये उधार घेतले होते. सिनेमा २०१८ मध्ये रिलीज होणार होता मात्र, तो नाही झाला. यानंतर वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर अमीषाने अखेर तीन कोटी रुपयांचा चेक अजय कुमार सिंह यांना दिला मात्र, तो चेकच बाउंस झाला असं अजय यांनी म्हटलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Have a rocking evening evryone

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

अजय कुमार सिंह यांनी अमीषा पटेल सोबतच तिचा बिझनेस पार्टनर कुणाल ग्रूमर याच्यावर सुद्धा आरोप केला आहे. अजय यांनी म्हटलं की, अमीषा आणि तिचा मित्र कुणाल माझे फोन कॉल्स उचलत नव्हते. इतकंच नाही तर कायदेशीर नोटीस बजावल्यानंतरही अभिनेत्री अमीषा त्याला उत्तर देत नव्हती. मी रांची जिल्हा न्यायालयात गेल्यावर्षी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता रांची न्यायालयाने अमीषा पटेल विरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी