आधी काली डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद, आता ट्वीटवरून वाद; लीना मणिमेकलाईचे नवे ट्वीट वादाच्या भोवऱ्यात

Amid Kaali poster row, Leena Manimekalai drops photo showing actors dressed as Lord Shiva and Goddess Parvati smoking : काली नावाची डॉक्युमेंट्री तयार करणारी निर्माती लीना मणिमेकलाई हिचे आजचे (गुरुवार ७ जुलै २०२२) ट्वीट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Amid Kaali poster row, Leena Manimekalai drops photo showing actors dressed as Lord Shiva and Goddess Parvati smoking
लीना मणिमेकलाईचे नवे ट्वीट वादाच्या भोवऱ्यात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आधी काली पोस्टर वाद
  • आता ट्वीटवरून वाद
  • लीना मणिमेकलाईचे नवे ट्वीट वादाच्या भोवऱ्यात

Amid Kaali poster row, Leena Manimekalai drops photo showing actors dressed as Lord Shiva and Goddess Parvati smoking : काली नावाची डॉक्युमेंट्री तयार करणारी निर्माती लीना मणिमेकलाई हिचे आजचे (गुरुवार ७ जुलै २०२२) ट्वीट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या ट्वीटमध्ये शंकर आणि पार्वती या भूमिका साकारणारे दोन लोक कलाकार निवांतपणे धूम्रपान करत असताना दिसत आहे. पण या दोन लोक कलाकारांच्या फोटोचा स्वतःच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी वापर करून घेतल्याचे चित्र आहे.

कॅनडाती आगा खान संग्रहालायाने एका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी लीना मणिमेकलाई यांनी डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीचे प्रमोशन करताना कॅनडात एका पोस्टरचा वापर करण्यात आला. या पोस्टरमध्ये देवी काली धूम्रपान करताना दिसत आहे तसेच तिच्या हातात समलिंगींच्या आंदोलनात वापरला जाणारा झेंडा आहे. याच पोस्टरवरून वाद झाला आहे. 

डॉक्युमेंट्रीच्या प्रमोशनच्या निमित्ताने हिंदू देवतेचा अपमान करून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्याची तक्रार भारतीय दूतावासाने कॅनडात नोंदविली आहे. ही तक्रार येताच कॅनडातील आगा खान संग्रहालायाने काली ही डॉक्युमेंट्री संग्रहालयात दाखविली जाणा नाही तसेच संग्रहालयाच्यावतीने काली या डॉक्युमेंट्रीच्या प्रमोशनसाठी कोणताही उपक्रम केला जाणार नाही असे जाहीर करण्यात आले.

संग्रहालयाने माफी मागून विषय संपविण्याचा प्रयत्न केला आहे. पण काली नावाची डॉक्युमेंट्री तयार करणारी निर्माती लीना मणिमेकलाई यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. पोस्टर काढण्याच्या कृतीचे समर्थन म्हणून लीना मणिमेकलाई यांनी लोक कलाकारांच्या फोटोचा सोयीस्कर वापर केला आहे.

लीना मणिमेकलाई यांनी केलेल्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर लीना मणिमेकलाई यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांकडे वादग्रस्त पोस्टर प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. याआधी तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी काली डॉक्युमेंट्रीच्या वादग्रस्त पोस्टरच्या प्रकरणात निर्माती लीना मणिमेकलाई यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भाजपने या प्रकारावर जोरदार टीका केली तर तृणमूल काँग्रेस पक्षाने खासदारानं केलेल्या वक्तव्याचा आणि पक्षाचा संबंध नाही असे सांगत या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी