अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना, उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल

Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण
  • उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालताय दाखल
  • अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन दिली माहिती

Amitabh Bachchan Tests Covid19 Positive: बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मुंबईतील (Mumbai) नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. ७७ वर्षीय अमिताभ बच्चन यांना कोरोना (Corona) झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन म्हटलं, "मला कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली आहे आणि त्यांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. गेल्या १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी ही विनंती."

प्रकृतीत सुधारणेसाठी सेलिब्रेटींकडून प्रार्थना

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रिकेटर्स आणि राजकीय नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ट्वीटरवरुन प्रार्थना करत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्वीट करुन अमिताभ बच्चन लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

वर्कफ्रंटचं बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती १२ होस्ट करणार आहेत. यासाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातच केबीसीचा प्रोमोट शूट केला होता. २५ जून ते ३ जुलैपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी ते दररोज प्रश्न विचारत होते.

काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केबीसीचा एक प्रोमो शूट केला होता. हा प्रोमो अमिताभ यांनी आपल्या घरातच शूट केला होता. यासोबतच अमिताभ बच्चन हे झुंड, चेहरे आणि ब्रह्मास्त्र या सिनेमांतही भूमिका करत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अमिताभ बच्चन खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळालं. अमिताभ यांनी स्थलांतरीत मजुरांना आपल्या स्वराज्यात परत जाण्यासाठी सुद्धा मदत केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी