अक्षय कुमारनंतर अमिताभ बच्चन यांची आसाम पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

बी टाऊन
Updated Jul 24, 2019 | 12:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अक्षय कुमारनंतर आता अमिताभ बच्चन आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रूपयांची मदत केली आहे.

amitabh bachchan
अमिताभ बच्चन 

थोडं पण कामाचं

  • अमिताभ यांची आसाम पूरग्रस्तांना मदत
  • अक्षय कुमारनेही केली होती मदत
  • बॉलिवूडच्या कलाकारांचे मदतीचे आवाहन

मुंबई: आसाममध्ये पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. केवळ माणसेच नव्हे तर जनावरांनाही या पुराचा फटका बसला आहे. तेथील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अशातच मदत कार्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. बिग बी यांना पुरग्रस्त पिडीतांसाठी केवळ योगदान दिलेले नाही तर इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

बिग बींनी केली ५१ लाखांची मदत

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ लाखांचे योगदान दिल्याबद्दल आम्ही श्री अमिताभ बच्चन यांचे आभार मानतो. ही लोकांची देखभाल करण्याची एक चांगली पद्धत आहे. तुमच्या समर्थनासाठी आसामच्या जनतेकडून आभार. अमिताभ बच्चन यांनी ट्विटचे उत्तर देताना लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

अमिताभ यांनी केले ट्वीट

बिग बी यांनी ट्विट केले, आसाम संकटात आहे, पुराने खूप नुकसान केले आहे. आपल्या भावा बहिणीच्या सुरक्षेसाठी तसेच मदतीसाठी त्यांना सहकार्य करा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करा. मी आताच केली आहे. तुम्ही केलीत का?

अक्षय कुमारनेही केली आहे मदत

अमिताभ बच्चन आधी अक्षय कुमारनेही आसामच्या पूरग्रस्तांसाठी २ कोटी रूपयांची मदत केली आहे. त्याने ट्विट करत म्हटले होते की, आसाममध्ये आलेला पूर हा हार्टब्रेकिंग आहे. माणूस असो वा जनावर सगळेच या पुराने प्रभावित झाले आहेत. मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोषामध्ये आणि काझीरंगा पार्क बचावासाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचे दान करू इच्थितो. यासोबतच अक्षयने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केल आहे. याशिवाय संजय दत्त, प्रियंका चोपडा आणि दिया मिर्झा या कलाकारांनीही सोशल मीडियावर चाहत्यांना या कठीण काळात मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे तेथील लोकांचे खूप हाल सुरू आहे. काझीरंगा पार्कमधील काही व्हिडिओजही व्हायरल झाले होते यात अनेक प्राणी पुराच्या पाण्यात वाहत जाताना दिसत होते. यामुळेच अनेक सेलिब्रेटी मदतीसाठी धावून आले आहेत. 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन अखेरचे बदला या सिनेमात दिसून आले होते. या सिनेमात तापसी पन्नू त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. सस्पेंस-थ्रिलर सामन्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. हा सिनेमा हिट ठरला होता. आता ते गुलाबो सिताबो या सिनेमात दिसणार आहे. यात पहिल्यांदा आयुषमान खुराना बिग बींसोबत काम करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी