amitabh bachchan injured during shooting project k : बॉलिवूडचे शहेनशहा महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना जखमी झाले. एक अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने पुढचे शूटिंग रद्द करण्यात आले. सध्या अमिताभ बच्चन डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार घेत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दुखापतीची माहिती स्वतःच्या ब्लॉगवरून दिली. बॉलिवूडचे शहेनशहा महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगसाठी गेले होते. या सिनेमात अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांच्या छातीला मार लागला. दुखापत झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांना वेदना होऊ लागल्या. यानंतर तातडीने शूटिंग रद्द करण्यात आले.
हैदराबाद येथील एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करण्यात आले. यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी अमिताभ बच्चन विमानाने मुंबईत आले. अमिताभ बच्चन सध्या मुंबईत डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार घेत आहेत. शरीराच्या दुखापत झालेल्या भागात स्ट्रॅपिंग करण्यात आले आहे. डॉक्टरांना अमिताभ बच्चन यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आहार आणि औषधांबाबतही डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. उपचार व्यवस्थित सुरू असले तरी अमिताभ बच्चन यांना श्वास घेताना वेदना होत आहेत. नॉर्मल होण्यासाठी किमान काही आठवडे लागतील असा अंदाज आहे. तब्येत नॉर्मल होईपर्यंत अमिताभ बच्चन यांनी त्यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केले आहेत.
अमिताभ बच्चन भारतीय मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेता, निर्माता, सूत्रसंचालक, माजी खासदार आहे. अमिताभ बच्चन त्याच्या हिंदी सिनेमांतील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त सिनेमांतून काम करणाऱ्या अमिताभ बच्चनने कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय टीव्ही शो पण केला आहे. त्याला आतापर्यंत 4 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार, 16 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त अमिताभला अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
अमिताभ बच्चनला 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. फ्रान्स सरकारने 2007 मध्ये त्याला नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन गौरविले आहे. जगभर अमिताभचे असंख्य चाहते आहेत.
Holi DP : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसाठी होळी डीपी । अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात
Ghee Purity Check Tips : तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे तंत्र । खऱ्याखोट्या मनुका तपासण्याचे तंत्र