अमिताभ बच्चन यांनी वापरलेल्या कारची OLX वर विक्री, किंमत केवळ...

बी टाऊन
Updated Jun 13, 2019 | 12:57 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Amitabh Bachchan Car: ज्या मर्सिडीज कारमधून अमिताभ बच्चन प्रवास करायचे त्या गाडीची ऑनलाइन विक्री होत आहे. खास बाब म्हणजे या कारची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

Amitabh Bachchan car sell on OLX
अमिताभ बच्चन यांची कार OLXवर विक्रीला 

मुंबई: OLX या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्ही जुन्या वस्तू विक्रीच्या जाहिराती पाहिल्याच असतील. मात्र, आता ओएलएक्सवर चक्क अमिताभ बच्चन यांची गाडी उपलब्ध झाली आहे. ज्या आलिशान आणि लक्झरी गाडीतून बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन प्रवास करत होते त्या गाडीची OLX वर विक्री होत आहे. खास बाब अशी आहे की या कारची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपली कोट्यावधी रुपयांची रॉल्स रॉयस फँटम कारची विक्री केली होती.

अमिताभ बच्चन यांनी काही काळापूर्वी आपली मर्सिडीज बेंज ही लक्झरी कार विकली होती. त्यानंतर आता या कारची पुन्हा एकदा विक्री होत असून तिसऱ्या मालकाचा शोध ओएलएक्सवर घेतला जात आहे. कारच्या मालकाने ही कार विकण्यासाठी OLX वर जाहिरात पोस्ट केली आहे. या जाहिरातीनुसार, या कारची किंमत 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आलिशान आणि लक्झरी गाड्या खूपच आवडतात. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचं खास कलेक्शन असल्याचं पहायला मिळतं. ज्यामध्ये मर्सिडीज एस-क्लास, रेंज रोववर, बेंटले जीटी, मिनी कूपर सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.

नुकतच अमिताभ बच्चन यांनी देशातील सर्वात महागडी MPV मर्सिडीज बेंज व्ही क्लास (Mercedes-Benz V-Class) खरेदी केली आहे. ही नवी कार खरेदी करताच त्याचे फोटोजही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपली कोट्यावधी रुपयांची रॉल्स रॉयस फँटम कारची विक्री केली होती. ही गाडी त्यांना विधू विनोद चोपडा यांनी 2007 साली भेट दिली होती. त्यावेळी या कारची किंमत 3.5 कोटी रुपये इतकी होती. अमिताभ बच्चन यांनी ही कार मार्च 2019 मध्ये म्हैसूर येथील एका बिझनसमनला विकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमिताभ बच्चन यांनी वापरलेल्या कारची OLX वर विक्री, किंमत केवळ... Description: Amitabh Bachchan Car: ज्या मर्सिडीज कारमधून अमिताभ बच्चन प्रवास करायचे त्या गाडीची ऑनलाइन विक्री होत आहे. खास बाब म्हणजे या कारची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles