Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना झालेली दुखापत; इन्स्टावर फोटो शेअर करून दिली Health Update

amitabh bachchan shared health update, big b rib was broken while shooting project k : बॉलिवूडचे शहेनशहा महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना जखमी झाले होते. आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे.

amitabh bachchan shared health update
बिग बींनी इन्स्टावर फोटो शेअर करून दिली Health Update  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन यांना झालेली दुखापत
  • बरगड्यांच्या मांसपेशींना झालेली दुखापत
  • बिग बींनी इन्स्टावर फोटो शेअर करून दिली Health Update

amitabh bachchan shared health update, big b rib was broken while shooting project k : बॉलिवूडचे शहेनशहा महानायक अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना जखमी झाले होते. एक अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली होती. पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते दुखापतीतून सावरले असल्याचे चित्र आहे. 

अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगसाठी गेले होते. या सिनेमात अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांच्या छातीला मार लागला. त्यांच्या बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली होती. यामुळे प्रोजेक्ट के तसेच इतर अनेक प्रोजेक्टचे शूटिंग रद्द करण्यात आले. हैदराबादमधील AIG रुग्णालयामध्ये उपचार आणि सीटी स्कॅन केल्यानंतर पुढील उपचार आणि आरामासाठी अमिताभ बच्चन मुंबईत आले. 

बिग बी यांनी आजच (सोमवार 20 मार्च 2023) काही तासांपूर्वी एक रॅम्प वॉक करतानाचा फोटो टाकून तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. दुखापतीतून सावरत आहे. रिकव्हरी वेगाने सुरू आहे अशी आनंदवार्ता अमिताभ बच्चन यांनी इन्स्टावर पोस्ट टाकून दिली आहे. अमिताभ बच्चन यांची हेल्थ अपडेट कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. बिग बी लवकर पूर्ण बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरू असल्याचेही चाहत्यांनी सांगितले.

वीजबिल पंख्याच्या स्पीडवर अवलंबून आहे का?

भारतात Long Drive ची मजा घेण्याची उत्तम ठिकाणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी