या गोष्टीमुळे अमिताभ बच्चन त्रस्त, ब्लॉगच्या माध्यमातून सांगितल्या व्यथा

बी टाऊन
Updated May 15, 2019 | 18:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amitabh bachchan facing health problem: अमिताभ बच्चन गेल्या बऱ्याच काळापासून आजाराशी सामना करत आहेत. त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : ७६ वर्षीय बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन मागील ३६ वर्षांपासून आपल्या जुहू येथील जलसा या निवासस्थानी दर रविवारी न चूकता आपल्या चाहत्यांची भेट घेतात.  ही विकली फॅन मिटिंग ‘संडे दर्शन’ म्हणूनही ओळखली जाते. बिग-बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात, हे आपल्याला माहीतच आहे. मागील काही दिवसापासून बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आजारपण आणि वेदनेशी झुंज देत आहेत, पण या वेदना त्यांना आपले काम करण्यापासून अडवू शकल्या नाहीत. मागच्या महिन्यात अमिताभजींनी आपल्या चाहत्यांना कळविले होते की, शारीरिक वेदनांचा त्रास वाढला असल्यामुळे रविवारी होणारे संडे दर्शन रद्द करतोय.  मंगळवारच्या ब्लाॅगमधून असं समजल की त्यांच्या वेदना अद्यापही संपल्या नाहीयेत.  

आपल्या आगामी चित्रपट ‘चेहरे’ चा लूक शेयर करत पुढे अमिताभ लिहीतात, ‘मिस्टर पेन…

'मिस्टर पेन जर तू बरा नाही झालास तर याच्या परिणामी तुला रिपेयर करावं लागेल आणि ते मी करू शकतो. कृपया याला हलक्यात घेवू नकोस, या वेदनांना हसण्यात संपवून टाक, मीही तसेच करेल.’ याआधी अमिताभ बच्चन यांनी अशा अनेक आजारपणावर खंबीरपणे मात दिली आहे, ऑक्टोबर २०१३ मध्ये सुद्धा अशाच एका आजारानं त्यांना घेरलं होत. पोटाच्या संसर्गाने डोक वर काढलं, असह्य वेदनांनी त्यांना ग्रासलं होतं. पण नेहमीप्रमाणे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना कोणताही आजार रोखू शकला नाही. त्यांनी पोटाच्या संसर्गावर हसत-हसत मात केली. 

 

 

 

त्यापुढे अमिताभ लिहीतात की, ‘अन्य पद्धतीने वेदना दूर करण्याच्या संघर्षामुळेच त्यांना ब्लॉग लिहायला उशिर झाला.’ पुढे ते लिहितात, ‘या आजारपणाला आव्हान देवून पर्यायी एक नवीन युद्ध सुरू केलं. माझ्या मते, आव्हान दिले नाही तर आजारपण प्रभुत्व गाजवतच राहील.’

‘चेहरे’ या रूमी जाफरी दिग्दर्शित चित्रपटात ते काम करत आहेत. इमरान हाशमी आणि अन्नू कपूरही या सिनेमातूनच अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच ‘ब्रम्हास्त्र’ आणि तमिळ फिल्म ‘उर्यन्ता मणिथन’ मधूनही अमिताभ आपल्या भेटीला येणार आहेत. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी