Amitabh Bachchanच्या घरी 'जलसा'मध्ये वटवाघळांचा हैदोस, फॅन्सकडून मागितल्या टिप्स

बी टाऊन
Updated Oct 27, 2021 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

amitabh bachchan want tips: बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आपल्या घरात सध्या वटवाघळांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांचा बंगला जलसामध्ये वटवाघळांनी हैदोस घातला आहे. यासाठी त्यांनी चाहत्यांकडून टिप्स मागितल्या आहेत. 

amitabh bachchan
Amitabh Bachchanच्या घरी जलसामध्ये वटवाघळांचा हैदोस 
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या समस्येबाबतत सांगितले आहे. 
  • अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांकडून वटवाघळांपासून सुटका मिळवण्यासाठी सल्लाही मागितला आहे. 
  • गेल्या वर्षभरापासून त्यांना वटवाघळांचा त्रास होत आहे. 

मुंबई: बॉलिवूडचे महान बिग बी अमिताभ बच्चन(amitabh bachchan) आपल्या घरात वटवाघळांनी(bat) त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या रूममध्ये वटवाघूळ घुसले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या बंगल्यात जलसामध्ये वटवाघळांनी हैदोस घातला आहे.अमिताभ यांनी या वटवाघळांपासून सुटका मिळवण्यासाठी चाहत्यांकडून टिप्स मागितल्या आहेत. या वटवाघळांमुळे त्यांच्या घरातील लोक चांगलेच घाबरलेत. amitabh bachchan want tips for removing bat from his house jalsa

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या समस्येबद्दल लिहिले. अमिताभ लिहितात... वटवाघूळ...हवीत तितकी सावधानता बाळगल्यानंतरही पुन्हा याच्याशी सामना झाला. अनेक गरजेच्या वस्तू मागवल्या ज्यामुळे यांच्यापासून सुटका होईल. जर तुमच्याकडे काही नवीन असेल जे आम्ही वापरले नाही तर त्याबद्दल सांगा. 

अमिताभ यांनी वटवाघूळ घालवण्यासाठी केले हे उपाय

अमिताभ बच्चन यांनी फॅन्सना सांगितले की आम्ही धूर केला, सॅनिटाईज्ड लिक्विड मारले, इलेक्ट्रॉनिक रिपेलंट गॅजेट आणि eucalyptus तेलाचा शिडकावाही केला. मात्र काहीच फायदा झाला नाही. लोक अमिताभ बच्चन यांच्या मागणीनंतर त्यांना टिप्सही देत आहेत. दरम्यान, ही किती मोठी समस्या असावी याचा अंदाज लावता येत नाही आहे. 

याआधी गेल्या वर्षी अमिताभ यांनी सांगितले होते की एक वटवाघूळ त्यांच्या रुममध्ये घुसले होते. जलसाचा तिसरा तळ, जिथे आम्ही सगळे बसतो आणि बोलतो. याआधी हे एरियामध्ये पाहिले नव्हते. 

अमिताभ बच्चन सध्या आपला क्विज रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीवरून खूप चर्चेत आहेत. या शोचा १३वा हंगाम ते होस्ट करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी