Abhishek Bachchan: 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'वरून परतताच अभिषेकवर कोसळला दु:खाचा डोंगर 

Abhishek Bachchan | अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलला भारतातील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान बॉलिवडूमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनने आणि मुलगी आराध्य बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.

Amitabh Bachchan's designer Akbar Shahpurwala has passed away
विदेशातून घरी परतताच अभिषेकवर कोसळला दु:खाचा डोंगर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलला भारतातील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती.
  • विदेशातून घरी परतताच अभिषेकवर कोसळला दु:खाचा डोंगर.
  • अमिताभ बच्चन यांचे कॉस्ट्यूम डिझायनर अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे.

Abhishek Bachchan | मुंबई : अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलला भारतातील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान बॉलिवडूमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनने मुलगी आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. आता हे सर्वजण मायदेशात परतले आहेत, मात्र घरी येताच अभिषेकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कॉस्ट्यूम डिझायनर अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. (Amitabh Bachchan's designer Akbar Shahpurwala has passed away). 

अधिक वाचा : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची का करतात पुजा? वाचा सविस्तर

अभिषेकने पोस्टमध्ये काय लिहले

अभिषेकने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहले की, "घरी परतताच मला एक धक्कादायक बातमी मिळाली. अकबर शाहपुरावाला यांचे निधन झाले आहे. मी त्यांना पहिल्यापासून अंकी अंकल असे म्हणत होतो. माझ्या वडिलांचे सूट आणि कॉस्ट्यूम्स हे त्यांनीच डिझाइन केले होते. त्यांनी तयार केलेला सूट माझ्याकडे अजूनही तसाच आहे. त्यांनी बनवलेला हा सूट मी रिफ्यूजी चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये घातला होता. सूट तयार करणे हे फक्त शिलाई करण्याचे काम नाही आहे, ती एक भावना आहे. असे ते मला सतत सांगायचे. त्यांनी माझे कॉस्ट्यूम्स खूप प्रेमाने डिझाइन केले होते."

अभिषेक बच्चनने आणखी म्हटले की, "माझ्यासाठी ते जगातील सर्वात सुंदर सूट तयार करणारे व्यक्ती होते. अक्की अंकल, तुम्ही माझ्यासाठी जे सूट बनवले आहेत, त्यापैकी एक मी आज घालणार आहे. अंकी अंकल तुमच्या आत्म्याला शांती लाभो! अशा शब्दांत अभिषेक बच्चनने आपल्या भावना व्यक्त केल्या. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी