Merry Christmas 2021: अमिताभ बनले क्यूट सांताक्लॉज, योग करत शिल्पाने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

बी टाऊन
Updated Dec 25, 2021 | 22:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Merry Christmas 2021: जिंगल बेल्स ख्रिसमस ट्री जिंगल बेल्स ट्यून आणि लाईटने सजलेले ट्री, मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेट केला जातोय. बॉलिवूडमध्येही हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो.

Merry Christmas 2021
बॉलिवूड आणि ख्रिसमस सेलिब्रेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलीवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  • अमिताभ बच्चन झाले क्यूट सांताक्लॉज
  • करीनाने फॅमिली ख्रिसमस कार्ड शेअर केले

Merry Christmas 2021: जिंगल बेल्स ख्रिसमस ट्री जिंगल बेल्स ट्यून आणि लाईटने सजलेले ट्री, मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेट केला जातोय. बॉलिवूडमध्येही हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. लाल ड्रेस, लाल टोपी, पांढरी दाढी, हातमोजे घातलेल्या सांताक्लॉजने फोटो शेअर करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  त्याच्या फोटोमध्ये फक्त नवीन गोष्ट म्हणजे सांताक्लॉजचा चष्मा. चाहत्यांनी बिग बींच्या या लूकला क्यूट सांता म्हणून संबोधले आहे. 


बॉलिवूडमध्येही हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेक स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत अमिताभ बच्चन यांनी सांताक्लॉज बनून ख्रिसमस कार्ड शेअर केले, तर शिल्पाने योगा करताना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

शिल्पाने अशा शुभेच्छा दिल्या आहेत

हातात गिफ्ट बॉक्स, डोक्यावर सांताक्लॉजची टोपी, दिवे आणि सजलेले ख्रिसमस ट्री, योगासने करताना शिल्पाने शेअर केले हे फोटोज ती लिहिते- 'तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा... हा दिवस तुमचे जीवन आनंदाने, हसू आणि प्रेमाने भरून जावो.' 


प्रीती झिंटाने एका प्रमोशनल व्हिडिओद्वारे लोकांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, करीना कपूर खानने तिच्या कुटुंबाचा एक मजेदार अॅनिमेटेड ख्रिसमस सेलिब्रेशन शेअर केला...करीनाजवळ उभा असलेला तैमूर आणि पापा सैफ अली खान जेहला आपल्या मांडीत घेऊन, हे फोटोज पाहून ख्रिसमसची अनुभूती येईल. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

 

 

 


सोहा आणि कुटुंबाचं ख्रिसमस सेलिब्रेशन 


सोहा अली खाननेही ख्रिसमसनिमित्त एक अतिशय क्यूट फोटो शेअर केला आहे. सोहा, कुणाल खेमू आणि त्यांची मुलगी इनाया ख्रिसमसच्या प्रिंटेड कपड्यांमध्ये दिसत आहेत. 
सोबत सोहाची आई शर्मिला टागोरही आहे. 

अक्षय कुमार, कियारा अडवाणी, नीतू कपूर, रणबीर कपूर, फराह खान यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी