अभिनेत्री अमृता रावने गोड बातमी देत म्हटलं...

बी टाऊन
Updated Oct 14, 2020 | 20:41 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावचा एक फोटो समोर आला आहे, या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. ज्यानंतर आता अमृतानेही आपल्या गरोदरपणाचं कन्फर्म केलं आहे.

amrita rao confirms about pregnancy
amrita-amol pregnant, photos go viral  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री अमृता राव हिने आपल्या गरोदरपणाचा खुलासा केला आहे
  • अमृता म्हणाली की तिचा नवरा अनमोल दररोज भगवद्गीता वाचून दाखवतो
  • बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अनुष्का शर्मा नंतर अभिनेत्री अमृता राव हिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अनुष्का शर्मानंतर अभिनेत्री अमृता राव हिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अमृता लवकरच आई होणार आहे. अलीकडेच तिचे फोटो समोर आले असून त्यात तिचा बेबी बंप दिसला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमृताने यावर शिक्कामोर्तब केले आहेे की ती गर्भवती असून लवकरच ती आई होणार आहे. अभिनेत्री अमृता म्हणाली की, तिचा नवरा अनमोल दररोज भगवदगीता वाचून दाखवतो.

अमृताने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, तिचा नवरा अनमोल दररोज तिला आणि आपल्या बाळाला भगवद्गगीता वाचून दाखवतो. अमृता तिच्या गरोदरपणाविषयी म्हणाली, "मला वाटतं की निसर्ग काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आपलं मूल आपल्यासमोर असणं महत्वाचे आहे."

अमृता म्हणाली की, सध्या मानसिक आरोग्य खूप महत्वाचे आहे आणि सुदैवाने बाळ जास्त डिमांडिंग नाही. अमृता म्हणाली, 'अगदी बाळालाही हे माहित आहे आणि त्यामुळेच ते जास्त डिमांडिंग नाही. मला कोणतीही विशेष डोहाळे नाही, मी जे पाहिजे ते खाते आणि बाळ त्यात आनंद मानतं.'

टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनुसार यापूर्वीही अमृताच्या गरोदरपणाबद्दल सांगितले होते की, “बहुतेक लोकांना सध्या अमृताच्या गरोदरपणाविषयी माहिती नाही. अमृता आणि अनमोल दोघेही अत्यंत खासगी आयुष्य जगतात. त्याचबरोबर, अमृता आई होण्याच्या भावनेने खूप आनंदी आहे आणि गर्भधारणेचा पूर्ण आनंद घेत आहे. अमृता आणि अनमोलचे 2016 साली लग्न झाले होते आणि त्याआधी हे दोघेही सात वर्ष डेट करत होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अमृता राव ही अंतिम वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये दिसली. या चित्रपटात तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी