Sid and Kiara : सिड-कियाराच्या रिसेप्शनचा शेअर केलेला एक अनसीन व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

बी टाऊन
Updated Feb 20, 2023 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kiara and Siddharth Mumbai reception:  सिध्दार्थ आणि कियाराने आपले प्रेम कधीच सोशल मीडियासमोर आणले नाही. ते जरी प्रेमात असले तरी त्यांनी आपले नाते कधीच अधिकृत केले नाही जोपर्यंत लग्न करत नाहीत. या  जोडीचे लग्नाचे सुंदर लुक्स आणि रोमॅंटीक फोटो त्यांच्या फॅन्सना आवडत आहेत. या दोघांच लग्न एकदम शाही थाटामाटात पार पडले.

An unseen video shared by Manish Malhotra of Sid-Kiara's Mumbai reception
खास मित्रांसाठी एक छोटसं रिसेप्शन   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • खास मित्रांसाठी एक छोटसं रिसेप्शन
  • राजस्थानमधील एका राजवाड्यात एकमेकांशी लग्नगाठ बांधली
  • डेकोरेशन पेस्टल थीमवर आधारित

Kiara and Siddharth Mumbai reception:  सिद्धार्थ आणि कियाराने आपले प्रेम कधीच सोशल मीडियासमोर आणले नाही. ते जरी प्रेमात असले तरी त्यांनी आपले नाते कधीच अधिकृत केले नाही, जोपर्यंत लग्न करत नाहीत. या जोडीचे लग्नाचे सुंदर लुक्स आणि रोमॅंटीक फोटो त्यांच्या फॅन्सना आवडत आहेत. या दोघांच लग्न एकदम शाही थाटामाटात पार पडले. (An unseen video shared by Manish Malhotra of Sid-Kiara's Mumbai reception)

सिद्धार्थ आणि कियाराची लव स्टोरी एखाद्या परीकथेसारखीच आहे.  एक देखणा राजपुत्र आणि सुंदर राजकन्येने राजस्थानमधील एका राजवाड्यात एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

या जोडप्याने लग्नानंतर दिल्लीत फॅमिली आणि जवळच्या खास मित्रांसाठी एक छोटसं रिसेप्शन ठेवलं होतं.  त्यानंतर लगेचच मुंबईत त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांसाठी एक लॅविश रिसेप्शन ठेवले. या रिसेप्शनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. आता बॉलिवूडचा फेमस डिजायनर मनिष मल्होत्रा याने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ज्यामध्ये पहिल्यांदाच सिड आणि कियारा यांच्या मुंबई रिसेप्शनमधील काही इनसाइड व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

या व्हिडिओमध्ये त्यांच्या रिसेप्शनचे डेकोरेशन दिसत आहे. हे डेकोरेशन पेस्टल थीमवर आधारित होतं. एक पियानोवादक सुखदायक गाणे वाजवत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने असं लिहीलं आहे की, "जस्ट ब्युटीफूल".

मनिषने फक्त व्हिडीओच नाही तर, दोघांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. आम्ही फक्त आशा करतो की सिड आणि कियारा असेच आनंदी राहतील आणि त्यांचे प्रेम चिरकाल टिकेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी