Ananya Panday Birthday : 23 वर्षांची अनन्या पांडे आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या अनन्याची नेटवर्थ

बी टाऊन
Updated Oct 30, 2022 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ananya Panday Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या नेटवर्थबद्दल (Net Worth) जाणून घेऊया.

Ananya Panday birthday to know her Net Worth
'ही' आहे अनन्या पांडेची नेटवर्थ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोट्यवधींची मालकीण आहे अनन्या पांडे
  • अनन्या पांडेकडे कारचे खूप कलेक्शन आहे
  • अनन्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

Ananya Panday Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला (Ananya Panday) कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीने अल्पावधीतच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनन्या पांडे तरुणींसाठी फॅशन आयकॉन बनली आहे. अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. अनन्या पांडे ही अभिनेत्री चंकी पांडेची मुलगी आहे. (Ananya Panday birthday to know her Net Worth)


'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनन्या पांडे ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. अनन्या देहेयान आणि लायगरमध्ये दिसली होती. लायगर सिनेमाद्वारे अनन्याने साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमात अनन्याने विजय देवरकोंडासोबत दिसली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ananya (@ananyapanday)

अधिक वाचा : अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून साजिदविरोधात छळाची तक्रार

अनन्याची नेटवर्थ जाणून घेऊया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे 72 कोटींची मालकीण आहे. अभिनेत्री खूप विलासी जीवन जगते. सिनेमांसोबतच अनन्या अनेक लक्झरी ब्रँड्सच्या जाहिरातीही करते. या जाहिरातींमधून अभिनेत्री करोडोंची फी घेते. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही चांगली कमाई करते. अनन्याकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे.

अनन्या पांडेला इंस्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक लोक फॉलोअर्स आहेत. अनन्या इंस्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. वर्क फ्रंटवर, अनन्या  सिद्धांत चतुर्वेदी सोबत 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे.

अधिक वाचा : रितेश-जेनिलियाच्या 'मिस्टर मम्मी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज


ड्रग्ज प्रकरणातही अनन्या पांडे अडकली होती

2021 मध्ये अनन्या पांडेचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीला आर्यन खान आणि अनन्याच्या चॅट्स मिळाल्या होत्या, त्यानंतर त्यांना दोनदा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अनन्याचे वडील चंकी पांडे यांच्यासह दोन्ही वेळा एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी