अनन्या पांडेने पुन्हा शेअर केले बोल्ड फोटो, पाहा ब्लू बिकिनीमधील तिचा ग्लॅमरस लूक 

Ananya Panday Bikini Photo:  अभिनेता ईशान खट्टरसमवेत अनन्या पांडे मालदीवमध्ये सुट्टीनंतर नुकतीच मायदेशी परतली. अनन्या मुंबईत परत आली असली तरी ती आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे.

ananya_panday_bikini
अनन्या पांडेने पुन्हा शेअर केले बोल्ड फोटो,  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अनन्या पांडेने पुन्हा एकदा तिचा बिकनी फोटो सोशल मीडियावर केला शेअर .
  • अनन्याने मालदीवमध्ये अनेकदा बिकिनी शूट केलं आहे. 
  • इशान खट्टर सोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती अनन्या

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मालदीवमध्ये आपला कथित बॉयफ्रेंड ईशान खट्टर याच्यासह नवीन वर्ष साजरं केलं. दोघेही ३० डिसेंबर रोजी मालदीवला रवाना झाले होते. त्यानंतर ते सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत होते. या दरम्यान अनन्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे बरीच चर्चेत होती.

अनन्याने शेअर केले ग्लॅमरस फोटो 

आता अनन्या पांडेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोत तिने समुद्र किनारी निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यामध्ये तिने मल्टीकलर फ्रिंज्ड जॅकेट परिधान केलं आहे आणि ती कॅमेर्‍यासाठी पोज देताना दिसत आहे. हे सुंदर फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले की, 'मी घरी परतलो आहे पण तरीही माझ्या मनात तेच आहे'.

यापूर्वी बिकिनीचे फोटोही केले होते शेअर 

अनन्याने तिच्या मालदीवच्या सुट्ट्यांमध्ये बिकीनीचे फोटो बर्‍याच वेळा शेअर केले होते, त्यामुळे तीही चर्चेत होती. अनन्याचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आणि ती तिच्या सुट्ट्यांचा आनंद लुटतानाही दिसली.

शाहिद कपूरचा छोटा भाऊ आणि अभिनेता ईशान खट्टर त्याच्याबरोबर अनन्या सुट्टीवर गेली होती. मागील काही दिवसांपासून या दोघांबद्दल बातम्या येत आहेत की ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत, पण असं असलं तरीही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप काहीही सांगितलेलं नाही. अलीकडेच दोघे कतरिना कैफच्या ख्रिसमस पार्टीमध्ये सुद्धा एकत्र दिसले होते.

यावर्षी रिलीज झालेल्या 'खाली पिली' चित्रपटात अनन्या आणि ईशानने एकत्र काम केल्याची माहिती आहे. मकबूल खान दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्कफ्रंटबद्दल विचार केल्यास अनन्या आता शकुन बत्राच्या चित्रपटात दिसणार असून यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, अनन्या विजय देवरकोंडासोबत एका चित्रपटातही दिसणार आहे, ज्यांचे नाव फायटर असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी