Ananya Pandey : अनन्या पांडेला करिअरच्या सुरुवातीला शारीरिक टीकेचा करावा लागला होता सामना, ब्रेस्ट सर्जरी करण्याचा दिला होता सल्ला

बी टाऊन
Updated Jun 03, 2022 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ananya Pandey : अनेकांना वाटते की स्टार किड्सना नेहमी गोष्टी सहज मिळतात.त्यांना कोणत्याही प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत नाही. पण इथे तुम्ही चुकताय, कारण अनन्या पांडेच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यावरून स्टार किड्सनाही टीकेला सामोरे जावे लागते. हे अधोरेखित झाले आहे.

Ananya Pandey had to undergo physical criticism at the beginning of her career, was advised to undergo breast surgery
अनन्या पांडेला शारीरिक टीकेला सामोरे जावे लागले होते.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनन्या पांडेला शारीरिक टीकेचा सामना करावा लागला होता
  • अभिनेत्रीने किस्सा सांगितला
  • ब्रेस्ट सर्जरी करून घेण्याचा मिळाला होता सल्ला

Ananya Pandey : अनेकांना वाटते की स्टार किड्सना नेहमी गोष्टी सहज मिळतात.त्यांना कोणत्याही प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत नाही. पण इथे तुम्ही चुकताय, कारण अनन्या पांडेच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यावरून स्टार किड्सनाही टीकेला सामोरे जावे लागते. हे अधोरेखित झाले आहे. 


अनन्या पांडेलाही अतिशय वाईट टीकेला सामोरे जावे लागल्याचं तिने नुकताच सांगितलं. हा संपूर्ण किस्सा अभिनेत्रीने नुकताच सांगितला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही त्या स्टार किड्सपैकी एक आहे जी सोशल मीडियावर बऱ्याचवेळा ट्रोल होते.  एका मुलाखतीत अनन्या पांडे म्हणाली होती की, स्टार किड्सनाही इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागतो. मात्र,अनन्या पांडेला या विधानाचा विसर पडला आणि आयुष्यात पुढे जाऊन आपली ओळख निर्माण करण्याचे काम तिने सुरू केले. आज बॉलिवूडमध्ये अनन्या पांडेचे नाव आहे. तिने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

अधिक वाचा : विमानतळाच्या कोविड टेस्टिंग कर्मचाऱ्याशी संगनमत करून सोन्याच

अनन्याने सांगितला हा किस्सा

अनेकांना वाटते की स्टार किड्सना नेहमी गोष्टी सहज मिळतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत नाही. मात्र, तुम्हाला जे वाटतं ते चुकीचं ठरू शकतं. कारण, अनन्या पांडेने केलेले लेटेस्ट विधान हेच सांगते की स्टार किड्सनाही टीकेला सामोरे जावे लागते. 'द रणवीर शो'मध्ये अनन्या पांडेने सांगितले की, तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात शारीरिक टिप्पणीचा सामना करावा लागला होता. हे प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचले होते की, अभिनेत्रीला ब्रेस्ट सर्जरी करून घेण्याचा सल्लाही देण्यात
आला होता. 

अधिक वाचा : दिवसाला किती कप कॉफी पिणं चांगलं? जाणून घ्या

अनन्या पांडे म्हणाली, "लोकांनी मला चेहरा, शरीरासह ब्रेस्ट सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला जो माझ्यासाठी खूप वेदनादायक होता. मी कामाला लागले तेव्हा लोकांच्या तोंडून या गोष्टी बाहेर पडल्या, आणि त्यांनी त्या अगदी सहजपणे बोलून दाखवल्या. थेट काहीही सांगितले नाही, पण मला समजले असंही अनन्या म्हटले आहे. ते म्हणायचे थोडे वजन वाढवायला हवे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या शरीरावरून जज करता." 


चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिला करण जोहरने 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून लॉन्च केले होते. टायगर श्रॉफसह तिने सिल्व्हर स्क्रीन शेअर केली होती. अनन्या पांडे म्हणाली की, मला कोणीही कोणतीही भूमिका देऊ असे वचन दिले नव्हते. अनन्या म्हणते, " मला नेहमीच एक अभिनेत्री व्हायचे होते, पण ते कसे व्हायचे हे मला माहित नव्हते. 
हा प्रवास माझ्यासाठी सोपा असेल असे वाटले नव्हते आणि तसा तो प्रवास सोपा नव्हताही. अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत लायगर सिनेमामध्ये दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी