Vijay Devarkonda : 'या' अभिनेत्रीला विजय देवरकोंडाला बघायचं Nude, म्हणते की...

बी टाऊन
Updated Jul 29, 2022 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vijay Devarkonda : विजय देवरकोंडा यांनी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये अनन्या पांडेने ( Ananya Pandey ) विजय देवराकोंडाला ( Vijay Devarkonda ) न्यूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनन्याने सांगितले की, विजय देवरकोंडा यांना पूर्णपणे न्यूड पाहण्यात तिला काहीच हरकत नाही. लायगर सिनेमाच्या पोस्टरसाठी विजय देवरकोंडा यांनी न्यूड पोज दिली आहे. 

Ananya Pandey wants to see Vijay Deverakonda in nude
'कॉफी विथ करण'मध्ये अनन्या-विजयची उपस्थिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'कॉफी विथ करण'मध्ये लायगर सिनेमाचं प्रमोशन
  • अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाची हजेरी
  • अनन्या पांडेला विजय देवरकोंडाला बघायचं Nude?

Vijay Devarkonda : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा ( Vijay Devarkonda ) याने करण जोहरचा ( Karan Johar ) प्रसिद्ध शो कॉफी विथ करण 7 (Koffee with Karan season 7 )  मध्ये हजेरी लावली होती.विजय देवरकोंडा त्याची को-स्टार अनन्या पांडेसोबत (Ananya Pandey ) शोमध्ये पोहोचला. विजय देवरकोंडा यांनी करण जोहरच्या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय देवरकोंडाने रॅपिड फायर राउंड आणि लक्झरी हॅम्पर देखील जिंकले. 

अधिक वाचा : mumbai : मुंबईतील आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार


विजय देवरकोंडा देणार न्यूड पोज? 

रॅपिड फायर राउंडमध्ये बरेच मजेदार प्रश्न होते. यातील एक प्रश्न होता, विजय देवरकोंडा आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड पोज देणार का? यावर उत्तर देताना विजय देवरकोंडा म्हणाला, जर का ते नीट शूट होणार असेल तर काहीच हरकत नाही. मात्र, आता विजय देवरकोंडा न्यूड शूट करणार की नाही हे येणारा काळच सांगेल. कारण सध्या रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरून चांगलाच गदारोळ झाला आहे. रणवीर सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंगच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटीही आले आहेत. रणवीरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)


अनन्याला कोणाला nude पाहायचे आहे? 

तसे, अनन्या पांडेनेही 'कॉफी विथ करण 7'मध्ये विजय देवरकोंडाला न्यूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनन्याने सांगितले की, विजय देवरकोंडा यांना पूर्णपणे न्यूड पाहण्यात काहीच अडचण नाही. अनन्या म्हणाली- विजयला लायगरच्या पोस्टरमध्ये थोडेसे न्यूड पाहिले आहे, आणि कोण विजय देवरकोंडा यांना न्यूड पाहण्यास इच्छित नसेल? विजय देवरकोंडा यांनी लायगर सिनेमाच्या पोस्टरसाठी न्यूड पोज दिली होती. एक पोस्टर समोर आले होते ज्यात विजय कपड्यांशिवाय होता. 

अधिक वाचा : BMC म्हणते की, मुंबईत आतापर्यंत 18 हजार खड्डे बुजवले

विजय देवराकोंडाच्या न्यूड दिसण्यावर कॉफ़ी विथ करण 7 मध्ये खूप चर्चा झाली आहे असे तुम्हालाही वाटत असेल. मात्र, खऱ्या आयुष्यात विजय देवरकोंडा एवढे धाडसी पाऊल उचलतो का तेच पाहायचं. येत्या 25 ऑगस्टला लायगर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहे. तेलुगु, तामिळसह हिंदीतही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी