IIFA 2022: मनिष मल्होत्राच्या डिझायनर साडीत अनन्या पांडेचा स्टनिंग लूक, पांढऱ्या ड्रेसमध्ये खुलले सारा अली खानचे सौंदर्य

बी टाऊन
Updated Jun 05, 2022 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

IIFA 2022: अबुधाबीमध्ये IIFA 2022 ची सुरुवात झाली असून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी येथे दाखल झाले आहेत. अनन्या पांडेपासून सारा अली खानपर्यंत बॉलिवूड स्टार्सचा लूक कसा होता पाहा या फोटोंमध्ये.

Ananya Pandey's stunning look in Manish Malhotra's designer saree, Sara Ali Khan in white dress
बॉलिवूड सेलिब्रिटींचा गॉर्जिअस लूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अबुधाबीमध्ये रंगला IIFA 2022 अवॉर्ड सोहळा
  • बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती
  • अनन्या पांडेचा गॉर्जिअस लूक, सारा अली खानचा जलवा

IIFA 2022: अबुधाबीमध्ये IIFA 2022 ची सुरुवात झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टनिंग, आणि गॉर्जिअस लूक पाहायला मिळाला. ज्यांना चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

अनन्या पांडे आणि सारा अली खान

अभिनेत्री अनन्या पांडेही सुंदर स्टाईलमध्ये दिसली. अनन्याने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पांढऱ्या रंगाची चमकदार साडी परिधान केलेली दिसली, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ananya (@ananyapanday)

याशिवाय सारा अली खानही व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये पोहोचली होती. साराने शॉर्ट अनारकली सूट आणि पलाझोमध्ये दिसली. 

अभिनेत्री क्रिती सेननने ऑफ शोल्डर गाऊन वेअर केला होता. तर, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती दिव्या खोसला देखील  पांढऱ्या रंगाच्या कॉश्च्युममध्ये दिसली. दिव्याने ऑफ शोल्डर ट्रेलसह शॉर्ट ड्रेस घातला होता. नेकपीस आणि डायमंड इअररिंगसह तिने तिचा लूक पूर्ण केला होता. त्याचवेळी अभिनेत्री शर्वरी येथे ब्लॅक आणि सिल्व्हर कलरच्या गाऊनमध्ये दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)

विकी कौशल आणि शाहिद कपूर

अभिनेता विकी कौशलने बेज जॅकेट आणि बेज ट्राउझर्ससह पांढरा शर्ट घातलेला होता. यासोबत त्याने काळे सनग्लासेस आणि ब्राऊन लेदरचे शूज घातले होते. तर शाहिद कपूर काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)


अभिषेक आणि ऐश्वर्या

अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चननेदेखील आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. अभिषेकने काळ्या सूटसह पांढरा शर्ट घातला होता, तर ऐश्वर्याने भरतकाम केलेला काळा फुल स्लीव्ह लाँग ड्रेस वेअर केला होता. यावेळी बॉलिवूडचा दबंग सलमान खान काळ्या रंगाचा शर्ट आणि सूट परिधान केलेला दिसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी