Anil Kapoor Disease: १० वर्षांपासून 'या' आजाराच्या वेदना सहन करत होते अनिल कपूर, विनाशस्त्रक्रिया समस्या दूर

बी टाऊन
Updated Oct 17, 2020 | 12:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीत असलेले अनिल कपूर गेल्या १० वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. आपण वाचून चकित व्हाल की त्यांनी शस्त्रक्रिया न करता हा आजार बरा केला.

Anil Kapoor
१० वर्षांपासून या आजाराच्या वेदना सहन करत होते अनिल कपूर 

थोडं पण कामाचं

  • अनिल कपूर गेल्या १० वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते
  • या आजाराचे नाव आहे अकिलिस टेंडन इंज्यूरी
  • या आजारात व्यक्तीच्या पायांच्या मागे खालच्या भागात दुखणे चालू होते

बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात फिट अभिनेत्यांच्या (fittest actors) यादीत समावेश असलेले अनिल कपूर (Anil Kapoor) गेल्या १० वर्षांपासून एका गंभीर आजाराशी (serious disease) झुंज देत होते. बाहेरून ते एकदम तंदुरुस्त दिसत होते, पण एका गंभीर आजाराच्या वेदना सहन करत होते. या आजाराचे नाव आहे अकिलिस टेंडन इंज्यूरी (Achilles tendon injury). या आजारात व्यक्तीच्या पायांच्या मागे खालच्या भागात दुखणे चालू होते. यामुळे चालता-फिरताना त्रास होतो आणि प्रचंड वेदनाही होतात. या समस्येने शस्त्रक्रिया (operation) करण्याची वेळही येऊ शकते. आपण वाचून चकित व्हाल की त्यांनी शस्त्रक्रिया न करता (without operation) हा आजार बरा (cured the disease) केला आहे.

इंस्टाग्रामवर केले फोटो शेअर

अनिल कपूर यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी आपले अनुभव सांगितले की कसे ते विनाशस्त्रक्रिया बरे झाले. त्यांनी असेही सांगितले की ते गेल्या १० वर्षांपासून या आजाराशी झुंज देत होते. जगभरातील डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. पण डॉक्टर मुल्लर यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मदतीने कोणतीही शस्त्रक्रिया न करता ते बरे झाले. आता ते रोज पळण्याचा व्यायामही करतात आणि स्किपिंगही करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

फिटनेसच्या बाबतीत अतिशय दक्ष आहेत अनिल कपूर

अनिल कपूर आपल्या फिटनेसच्या बाबतीत बरेच गंभीर असतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज अजिबातच लावता येत नाही. हजारो-लाखो लोक फिट राहण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यांनी अनेकदा आपले व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

या चित्रपटांवर काम करत आहेत अनिल कपूर

भविष्यात अनिल कपूर हे अभिनव बिंद्राच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसणार आहेत. या चरित्रपटात ते त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरसह पडद्यावर दिसणार आहेत. तसेच ते करण जोहरच्या मल्टिस्टारर ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहेत. ते शेवटचे ‘मलंग’मध्ये दिसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी