Annu Kapoor is again in love : घटस्फोट घेतल्यावर केलं दुसरं लग्न अन् पुन्हा पहिल्या पत्नीच्या प्रेमात, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Annu Kapoor is again in love : अभिनेते अन्नू कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख बनवली. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांची पर्सनल लाईफ सुद्धा खूप इंट्रेस्टिंग आहे. जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी...

Annu Kapoor again in love with divorced wife anupama read full love story in marathi
Annu Kapoor: दुसरं लग्न केल्यानंतरही पहिल्या पत्नीला लपून-छपून भेटत होते अन्नू कपूर, जाणून घ्या नेमकं काय घडलं? 

Annu Kapoor is again in love : अभिनेते अन्नू कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. अन्नू कपूर यांनी सिनेमांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलं आहे. खूप स्ट्रगल केल्यावर आपली ओळख बनवलेल्या अन्नू कपूर यांच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक चढ-उतार आले होते. जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरीबाबत...

अन्नू कपूर यांच्या आयुष्यात अशी एक वेळ आली जेव्हा जे आपल्या घटस्फोट दिलेल्या पहिल्या पत्नीच्याच प्रेमात पडले. इतकेच नाही तर दुसऱ्या पत्नीपासून लपून-छपून ते घटस्फोट दिलेल्या पहिल्या पत्नीला भेटत होते.

अन्नू कपूर यांनी 1992 मध्ये केलं लग्न

अन्नू कपूर यांनी पहिलं लग्न अनुपमा सोबत 1992 मध्ये केलं होतं. मात्र, वर्षभरातच त्यांचं लग्न तुटलं. त्यानंतर अनुपमा अमेरिकेत गेल्या तर अन्नू कपूर इथे आपल्या कामात व्यस्त झाले. दोघांमध्ये सातत्याने काहीना काही गोष्टींवरुन वाद होत होते. ज्यावेळी त्यांना वाटले की, वाद वाढत आहे आणि त्यामुळे आपण वेगळे झालेलं बरं तेव्हा त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा : दररोज एक संत्री खायला हवी का?

दुसऱ्या पत्नीला सुद्धा घटस्फोट

त्यानंतर अन्नू कपूर यांनी 1995 मध्ये अरुणिता मुखर्जीसोबत लग्न केलं. अंताक्षरी शो मध्ये या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झालं.

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

यानंतर मधल्या काळात अन्नू कपूर आणि त्यांची पहिली पत्नी अनुपमा यांची अमेरिकेत एकदा भेट झाली. ही भेट इतकी खास होती की दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवणं चांगले वाटू लागले. त्यानंतर अन्नू कपूर हळूहळू आपल्या दुसऱ्या पत्नीपासून लपून-छपून अनुपमा यांना भेटू लागले. याची माहिती झाल्यावर अरुणिता यांनी अन्नू कपूर यांना घटस्फोट दिला. 

हे पण वाचा : Arogya Vibhag Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई मनपा अंतर्गत रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या पद आणि पगार किती मिळेल

2005 मध्ये अरुणिताने अन्नू कपूर यांना घटस्फोट दिला. त्यानंतर अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा आपली पहिली पत्नी अनुपमा सोबत 2008 मध्ये लग्न केलं. दोघांना तीन मुलं आहेत. दोघेही आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत आणि एकदम सिनेमातील स्टोरी प्रमाणे आयुष्य जगत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी