अनूप जलोटा बनले श्री सत्य साई बाबा, पाहा त्यांचा हा फोटो का होतोय व्हायरल 

Anup Jalota Shri Satya Baba: सोशल मीडियावर भजन सम्राट अनूप जलोटाचा एक नवा लूक व्हायरल होत आहे. हा लुक अध्यात्मिक गुरु श्री सत्य साई बाबा यांच्या बायोपिकमधील आहे.

Anup Jalota Shri Satya Baba
अनूप जलोटा बनले श्री सत्य साई बाबा!  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • भजन सम्राट अनूप जलोटा श्री सत्य साईबाबांची भूमिका साकारणार.
  • या चित्रपटातील भजन सम्राट अनूप जलोटा यांचा पहिला लूक समोर आला आहे.
  • या लूकमध्ये अनूप जलोटा हे अगदी सत्य बाबांसारखेच दिसत आहे.

मुंबई: अध्यात्मिक गुरु श्री सत्य साई बाबा (shri satya sai baba) यांच्या बायोपिकमध्ये (biopic) लवकरच भजन सम्राट अनूप जलोटा (anoop jalota) दिसणार आहेत. अनूप जलोटा यांचा या चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. या लूकमध्ये अनूप जलोटा या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

अनूप जलोटा एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, 'मी ५५ वर्षांपूर्वी श्री सत्य साई बाबांना भेटलो होते. त्यावेळी मी १२ वर्षांचा होतो. त्यांनी माझे व माझ्या वडीलांचे भजन ऐकल्यानंतर आम्हाला आशीर्वाद दिला होता. अनूप जलोटा म्हणाले, मी त्यावेळी लखनौला होतो. तेव्हापासून मी सतत बाबाजींच्या संपर्कात होतो. मी त्यांना दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि ऊटी येथे भेटलो आहे. इतकेच नाही तर पुट्टपार्थीच्या आश्रमात मी त्यांना भेटण्यासाठी कित्येकदा गेलो होतो.

अनूप जलोटा पुढे असंही म्हणाले की, 'मला वाटतं मी या भूमिकेला न्याय देऊ शकतो. मी सत्य साई बाबांचा अनुयायी आहे. अशा परिस्थितीत ते कसे बसत असतील, कसे चालत असतील, कसे बोलत असतील हे मला बऱ्यापैकी माहित आहे. '

अनूप जलोटा पुढे म्हणाले, 'ते मला 'छोटे बाबा' असे म्हणायचे. जेव्हा मी त्यांना याचे कारण विचारायचो तेव्हा ते म्हणायचे की, एक दिवस तुला याची जाणीव होईल. मला आता ते असं का बोलायचे ते आता समजतं आहे.'


श्री सत्य बाबांच्या जीवन चरित्रावर आधारित हा चित्रपट २२ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होईल. दरम्यान, या चित्रपटाशिवाय अनूप जलोटा हे जसलीन मथारू सोबत आणखी एका चित्रपटात दिसणार आहेत.

अनूप जलोटांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अनूप जलोटा भगवान कृष्णाच्या लूकमध्ये दिसत आहेत. हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा लूक असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी