Oo Antava फेम समंथा रुथ प्रभूने रचला एक नवा इतिहास

Samantha Ruth Prabhu in Indian Film Festival Melbourne: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात चीफ गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. जाणून घ्या काय असेल समंथाचा नेमका कार्यक्रम..

another achievement in name of samantha ruth prabhu indian film festival of melbourne will be chief guest of 2022
Oo Antava फेम समंथा रुथ प्रभूने रचला एक नवा इतिहास 
थोडं पण कामाचं
  • मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये समंथा रुथ प्रभू ही चीफ गेस्ट असणार.
  • समंथा रुथ प्रभू 13 ऑगस्ट रोजी तिच्या चाहत्यांना भेटणार.
  • दोन वर्षांनी होत आहे हा चित्रपट महोत्सव.

Samantha Ruth Prabhu on Indian Festival of Melbourne: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांशी संबंधित असलेले नाव आहे. समंथा रुथ प्रभू हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तिने आपल्या हिंदी प्रोजेक्टची सुरुवात Amazon Prime च्या वेब सिरीज The Family Man 2 ने केली होती. तिच्या पदार्पणापासून, समांथाने बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींप्रमाणेच आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. आता सामंथाच्या खात्यात आणखी एका कामगिरीची नोंद झाली आहे. मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या अभिनेत्रीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

समंथा रुथ प्रभू (Samanatha Ruth Prabhu)12 ऑगस्टपासून मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन राज्याच्या राजधानीत तिच्या चाहत्यांना भेटणार आहे. तिचे शेकडो चाहते आणि याच चाहत्यांना आता समंथा भेटणार आहे. समंथा 13 ऑगस्ट रोजी आपल्या करिअरबद्दल बोलत लाइव्ह प्रेक्षकांसमोर येणार आहे. यादरम्यान ती एक खास भाषण करणार आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांच्या कालावधीनंतर, समंथा ही आता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

अधिक वाचा: करिना कपूर तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा

पाहा समंथा रुथ प्रभू नेमकं काय म्हणाली:

समंथा रुथ प्रभू म्हणाली की, 'गेल्या वर्षी, मी IFFM चा भाग असतानाही, सर्व सहभागींच्या उत्साहामुळे मला उर्जा आणि उत्साह अनुभवता आला. जगातील सर्व व्यवसाय पुन्हा सुरु झाल्यानंतर आता आता ऑस्ट्रेलियाची सैर करण्यासाठी मी उत्सुक आहे. वैयक्तिकरित्या ही उर्जा अनुभवण्यासाठी प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. भारतीय सिनेमा हे भारतीय नागरिकांसोबत पाहणं ही एक रोमांचक भावना आहे.' 

अधिक वाचा: राखी सावंत म्हणाली, मी तर भारताची कोहिनूर, मोदीजी माझ्यासाठी काहीही करु शकतात!

महोत्सवाचे संचालक मिठू भौमिक लांगे म्हणाले, “ऑस्ट्रेलियातील समांथाचे चाहते ती IFFM मध्ये सहभागी होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये तिच्या कामाचा गौरव करण्यात येणार आहे. ती तशी प्रतिभावान अभिनेत्री आहे, तिच्या कामाबद्दल तिला तिच्या चाहत्यांमध्ये निस्सीम आदर मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी