'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' गाण्याचे टीझर

बहुप्रतीक्षित चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' या पहिल्या गाण्याच्या टीझरचे लाँचिंग झाले. गणेशोत्सवाची सुरुवात शुक्रवार १० सप्टेंबर पासून होईल. या वातावरणासाठी हे एकदम परफेक्ट गाणे

antim the final truth first teaser of vighnaharta song
'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' गाण्याचे टीझर 

थोडं पण कामाचं

  • 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' गाण्याचे टीझर
  • उत्सवी वातावरणासाठी परफेक्ट गाणे
  • 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच  मोठ्या पडद्यावर एकत्र

मुंबईः बहुप्रतीक्षित चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' या पहिल्या गाण्याच्या टीझरचे लाँचिंग झाले. गणेशोत्सवाची सुरुवात शुक्रवार १० सप्टेंबर पासून होईल. या उत्सवी वातावरणासाठी हे एकदम परफेक्ट गाणे आहे. हा टीझर गणेशोत्सवाच्या भव्यतेला दर्शवतो.

'विघ्नहर्ता' हे गाणे ऊर्जा आणि भव्यता असलेले एक परिपूर्ण फेस्टिवल साँग आहे. गणपती उत्सवाचे सार या टीझरमध्ये सामावले आहे. हा टीझर म्हणजे गाण्याचा हा ट्रॅक कसा आहे याची परफेक्ट झलक आहे. गाण्याच्या या अनोख्या टीझरसोबत चित्रपटाबाबतचा उत्साह आधी पेक्षा अनेक पटीने वाढला आहे. टीझरमधून सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आकर्षक आणि मोहक अदा पाहायला मिळतात.

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच  मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी