Emergency : कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटातील अनुपम खेरचा फर्स्ट लूक आला समोर, साकारणार ही दमदार भूमिका

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 24, 2022 | 06:00 IST

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (actress) कंगना राणौत (Kangana Ranaut) लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात दिसणार आहे.  कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सतत चर्चेत असतो. दरम्यान, निर्मात्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटातील अभिनेता (Actor) अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे.

Anupam Kher's first look is out from Emergency
इमर्जन्सी चित्रपटातील अनुपम खेरचा फर्स्ट लूक आला समोर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे.
  • इमर्जन्सी या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
  • कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

Anupam Kher As Jayaprakash Narayan : मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (actress) कंगना राणौत (Kangana Ranaut) लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात दिसणार आहे.  कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सतत चर्चेत असतो. दरम्यान, निर्मात्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटातील अभिनेता (Actor) अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता अनुपम खेरने काही काळापूर्वी सोशल मीडियावर 'इमर्जन्सी' चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर शेअर केला. यासोबतच या अभिनेत्याने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलही खुलासा केला आहे. कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात अनुपम खेर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित राजकारणी जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच या चित्रपटात अनुपम खेर यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Read Also : पावसाळ्यात तुमच्या कारमधील सर्वात महत्त्वाच्या 5 वस्तू...

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना जोरदार कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे - निर्भीडपणे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. कंगना राणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी'मध्ये लोकनायक जेपी नारायण यांची भूमिका करताना मला खूप आनंद झाला आहे.

Read Also : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी..

 कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, या चित्रपटातील तिचे लूक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले, ज्यासाठी तिला खूप प्रशंसा देखील मिळाली.

देशातील सर्वात मोठी राजकीय घटना 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार 25 जून 1975 रोजी देशभरात आणीबाणी घोषित करण्यात आली होती.  जयप्रकाश नारायण यांनी त्यावेळी इंदिरा गांधींच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. ज्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलनात उतरले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी