अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्यावर अनुराधा पौडवालांनी उपस्थित केले सवाल

Anuradha Paudwal on Azaan : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल सध्या चर्चेत आहेत. निमित्त आहे ते त्यांनी अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे.

Anuradha Paudwal seeks ban on loudspeakers for Azaan And Veteran singer says people will start playing Hanuman Chalisa
अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्यावर अनुराधा पौडवालांनी उपस्थित केले सवाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्यावर अनुराधा पौडवालांनी उपस्थित केले सवाल
  • मला आखाती देशांमध्ये फिरताना अजानसाठी लाउडस्पीकर वापरल्याचे दिसले नाही - अनुराधा पौडवाल
  • धर्माच्या नावाखाली चुकीच्या प्रथा परंपरांना प्रोत्साहन आणि महत्त्व दिले जाऊ नये - अनुराधा पौडवाल

Anuradha Paudwal talk About Azaan on loudspeakers : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल सध्या चर्चेत आहेत. निमित्त आहे ते त्यांनी अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे. एका मुलाखतीत अजानच्या मुद्यावर बोलताना अनुराधा पौडवाल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. 
भारतात अजानसाठी लाउडस्पीकरचा वापर होतो. पण जगात इतरत्र ही पद्धत अजानसाठी वापरली जात नाही. मी अनेक देशांमध्ये फिरले आहे. तिथे अजानसाठी लाउडस्पीकर वापरल्याचे बघितले नाही. आपल्या देशात लाउडस्पीकर वापरून अजान ऐकवण्याला मुद्दाम प्रोत्साहन आणि महत्त्व दिले जात आहे. मला आखाती देशांमध्ये फिरतानाही अजानसाठी लाउडस्पीकर वापरल्याचे दिसले नाही; असे अनुराधा पौडवाल यांनी सांगितले. 

मी कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. पण धर्माच्या नावाखाली चुकीच्या प्रथा परंपरांना प्रोत्साहन आणि महत्त्व दिले जाऊ नये असे वाटते; असेही अनुराधा पौडवाल म्हणाल्या. 

जर लाउडस्पीकर वापरून अजान ऐकविली जाणार असेल तर याच पद्धतीने इतरांनाही त्यांच्या धार्मिक कार्यासाठी लाउडस्पीकरचा वापर करू देण्यास काय हरकत आहे; असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. अनेक आखाती देशांमध्ये अजानसाठी लाउडस्पीकरचा वापर करण्यावर बंदी आहे. मग भारतात असे का नाही, असाही प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. 

जर मुस्लिम देशांमध्ये अजानसाठी लाउडस्पीकरचा वापर होत नाही मग भारतात अजानसाठी लाउडस्पीकरचा वापर का केला जात आहे, असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. अजानसाठी लाउडस्पीकरचा वापर होणार असल्यास हनुमान चालीसा पण लाउडस्पीकरवरून ऐकविण्यास सुरुवात होईल. यावरून वाद वाढणार असेल तर चुकीच्या प्रथा आणि परंपरा यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे का, असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला.

चैत्रातील नवरात्र आणि रामनवमीच्या निमित्ताने देशातील तरुणाईला चार वेद, अठरा पुराण, चार मठ यांची माहिती देणे आवश्यक आहे. तरुणाईला स्वतःच्या धर्माविषयी आणि संस्कृतीविषयी योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. हे आपल्या ज्ञानाचे मूळ आहे आणि ते आपण जाणून घेणे आवश्यक आहे; असे अनुराधा पौडवाल यांनी सांगितले.

याआधी गायक सोनू निगम यानेही अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्याच्या मुद्यावरून नाराजी जाहीर केली होती. भारतातील अनेक कोर्टांनी वेगवेगळ्या खटल्यांमध्ये अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्याच्या विरोधात निर्णय दिले आहेत. अलिकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईत सभा घेतली. या सभेत राज यांनी अजानसाठी लाउडस्पीकर वापरले जाणार असतील तर लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा ऐकविली जाईल, असा इशारा दिला होता. राज यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईच्या पूर्व उपनगरात घाटकोपर येथे मनसेच्या कार्यकर्त्याने सार्वजनिक चौकात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण ऐकविण्यास सुरुवात केली होती. पण मुंबई पोलिसांनी हे पठण बंद पाडून मनसेच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई केली. विना परवानगी लाउडस्पीकर वापरल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी