अनुराग कश्‍यपची मुलगी आलियाचा खळबळजनक खुलासा, लहान वयात झाले होते लैंगिक शोषण

बी टाऊन
Updated Feb 27, 2021 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांची मुलगी आलिया कश्‍यप हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. लहानपणी एका मध्यमवयीन व्यक्तीने तीचे लैंगिक शोषण केले असल्याचे तीने सांगितले आहे.

Anurag Kashyap's Daughter, Alia was sexually harassed by a middle aged man
आलिया कश्यप  

थोडं पण कामाचं

  • अनुराग कश्‍यपची मुलगी आलिया कश्‍यपने केला मोठा खुलासा
  • आलिया म्हणते ती लहान असताना एका मध्यमवयीन व्यक्तीने केले होते लैंगिक शोषण
  • आलिया कश्यपने वाईट कंमेट्सचा स्क्रिनशॉटही समाजमाध्यमांवर शेअर केला आहे

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांची मुलगी आलिया कश्‍यप हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. लहानपणी एका मध्यमवयीन व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केले असल्याचे तिने एका इंस्टाग्राम पोस्टमधून लिहिले आहे.

आलिया कश्यपने इंस्टाग्रामवरील आपल्या फोटोवरील आक्षेपार्ह्य कमेंट्स चा स्क्रीनशॉट समाजमाध्यमावर शेअर केला आहे. यासोबतच तिने लैंगिक शोषणाबद्दलची आठवण सांगत जूना अनुभवही शेअर केला आहे. यातून, बलात्कारी मानसिकतेचा विरोध करत आपल्या भावना तिने या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.  

आलियाने इंस्टाग्रामवरील पोस्‍टमध्ये लिहिले की, 'मागील काही आठवड्यांपासून मला मानसिक त्रास होत आहे. जेव्हापासून मी अंडर गारमेंट्समधील माझे फोटो पोस्ट केले आहेत, तेव्हापासून, त्यावर मला खूप घाणेरडे आणि आक्षेपार्ह्य कमेंट्स वाचायला मिळत आहेत. बलात्काराची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. याची मला फारशी भीती वाटायची नाही. माझे लैंगिक शोषण होऊनही मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अशाप्रकारच्या कमेंट्स किंवा वागणूकी बलात्कारी विचारांना खतपाणी घलतात. त्यामुळे याविरोधात समोर येऊन बोलणे अत्यंत महत्वाचे आहे.'

आलिया कश्यप पुढे लिहितात, 'हा देश जोपर्यंत एखादी महिला जिवंत आहे किंवा तिच्यासोबत काही घटले नाही तोपर्यंत तिच्या सुरक्षेसाठी काहीच करत नाही. परंतु, ती मेल्यावर, लैंगिक अत्याचार झाल्यावर कॅंडल मोर्चा फक्त काढतो. सत्य तर हे आहे की भारतात महिला आपले पूर्ण आयुष्य लैंगिक शोषणाचा सामना करण्यात घालवतात.' त्यापुढे आलिया त्यांचा अनुभव सांगतात की, 'जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा एका मध्यमवयीन व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केले होते. माझे आणि इतरही महिलांचे लैंगिक शोषण केलेले ते लोक नेहमी दुटप्पी भूमिका घेतात. नैतिकतेला एका उंचीवर नेत असल्याचा ते केवळ दिखावा करतात. परंतु, प्रत्यक्षात ती बलात्कारी मानसिकतेला प्रोत्साहन देणारी माणसे आहेत.'

चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांची मुलगी आलिया कश्यप सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. यात तिने आपले इनरवेअर्स घालून फाटो काढल्याचे दिसते. अशात तिचे हे फोटो इंटरनेटवरही व्हायरल होत होते. आलियाने हे फोटो लक्ष वेधन्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी टाकल्याचीही शक्यता असु शकते. मात्र, आता तेच त्यांच्या समस्येचे कारण बनले आहेत. आलिया कश्‍यपला या फोटोमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

आलिया कश्‍यप ही अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि त्यांच्या पुर्वपत्नी आरती बजाज (Aarti Bajaj)यांची मुलगी आहे. आलिया म्हणते की, तिला अशा ट्रोलिंगने त्यांना काही फरक पडत नाही. कारण, लोकं ते मोबाइलमागे लपून करत असतात आणि मी प्रामाणिकपणे त्यांना सरळ ब्लॉक करत असते. आलिया आपल्या इंस्टाग्रामवर खूप ऍक्टीव्ह असतात आणि आपले फोटो सतत शेअर करत असतात. त्यांचे बॉलिवुडमध्ये येण्याचे काही नियोजन नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी