गृहमंत्री अमित शहांवर टीका करताना अनुराग कश्यपची जीभ घसरली!

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jan 27, 2020 | 12:57 IST

Anurag Kashyap Tweet: बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला आहे.

anurag kashyap's slip of tongue while criticizing home minister amit shah
गृहमंत्री अमित शहांवर टीका करताना अनुराग कश्यपची जीभ घसरली!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची गृहमंंत्री अमित शहांवर टीका
  • अमित शहांवर टीका करताना अनुराग कश्यपची जीभ घसरली
  • ट्विटरवरुन केलेल्या टीकेनंतर अनुराग कश्यप ट्रोल

मुंबई: गँग्स ऑफ वासेपूर, गुलाल यासारखे हिट चित्रपट बनवणारा निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे.  घटनात्मक पदावर असलेल्या अमित शहा यांना त्याने 'भ्याड आणि जनावर' म्हणून संबोधले आहे. अनुराग कश्यपने एका ट्वीट केले आहे. त्यावेळी अमित शहा यांच्यावर टीका करताना त्याची जीभ घसरली. 'आमचे गृहमंत्री किती डरपोक आहेत. स्वतःचेच पोलीस, त्यांचेच गुंड, स्वतःचे लष्कर आणि स्वत:चीच सुरक्षा वाढवतो आणि निशस्त्र निदर्शकांवर हल्ला करवतो. जर नीचपणाची हद्द असेल तरी आहे @AmitShah. इतिहास या जनावरावर थुंकेल.'

अनुराग कश्यप यांच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर युजर्सने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने अनुराग कश्यपच्या हे असंस्कारी असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी एका यूजरने कश्यपला असा सवाल विचारला आहे की, 'आता आपण सीएएच्या विरोधासाठी पुढे आलात, पण जेव्हा काश्मिरी पंडितांनी धक्के मारून बाहेर काढलं जात होतं तेव्हा कुठे होता तुम्ही? याचवेळी, यूजरने अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे.

 

 

गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी अनुराग कश्यपने असे शब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वी देखील अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अपशब्द वापरले आहेत. यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले आहेत. 

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर  देशभरात आंदोलने होत आहेत. जेएनयू, जामिया आणि एएमयू यासारख्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनं केली आहेत. ज्यानंतर सिनेजगातील अनेक जण या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेता झीशान अयूब, अभिनेत्री स्वरा भास्कर यासारख्या कलाकारांनी सीएएला विरोध सुरू केला आहे. यांच्याप्रमाणेच  अनुराग कश्यप याने देखील सीएएला विरोध केला आहे. 

अनुराग कश्यपने याआधी हे ट्वीट केले आहेत:  

'भक्त आणि IT Cell मला शिव्या देऊ देत, धमकावू देत, खोटं पसरवू देत. आणि आता म्हणतील की, आता काय कराल, आता तर सीएए लागू झाल आहे. याचा अर्थ असा की, या सर्वांच्या वर जे बसलेले आहेत दोघं शहा/मोदी आणि त्यांची भाजप, हे आता तुम्हाला घाबरले आहेत. त्यामुळे आता मागे हटू नका. झेंडा हाती घेऊन त्यांना सांगायचं आहे की, ते देशद्रोही आहेत. आम्ही नाही.' 

 

 

 

 

'आज सीएए लागू झाला आहे. मोदींना सांगा सर्वप्रथम आपले कागदपत्र, आपली पदवी,  “entire political science” दाखवा, आणि आपल्या वडिलांचे आणि कुटुंबीयांचे जन्म प्रमाणपत्र संपूर्ण भारताला दाखवा. मग आमच्याकडे मागा.'

 

 

'आधी विद्यार्थ्यांची डोकी फोडा, मग हल्लेखोरांना जाऊ द्या आणि गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवा आणि ज्यांची डोकी फुटली त्यांनाच दोषी ठरवा. वाह रे जुमला सरकार. व्वा, दिल्ली पोलिस.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी