अनुष्का शर्माने दिली होती '3 इडियट्स' या चित्रपटासाठी ऑडिशन, व्हायरल झाला जुना व्हिडिओ

बी टाऊन
Updated May 01, 2021 | 11:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अशा सेलिब्रिटीजपैकी एक आहे जे नेहमीच चर्चेत असतात. आता अनुष्काचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आमिर खानच्या गाजलेल्या '3 इडियट्स' या चित्रपटासाठी ऑडिशन देत आहे.

Anushka Sharma
अनुष्का शर्माने दिली होती '3 इडियट्स' या चित्रपटासाठी ऑडिशन, व्हायरल झाला जुना व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील संवाद बोलत आहे अनुष्का
  • '3 इडियट्स'नंतर 5 वर्षांनी केले आमिर खानसोबत काम
  • अभिनेत्री ते निर्माती असा झाला अनुष्काचा प्रवास

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अशा सेलिब्रिटीजपैकी (celebrities) एक आहे जे नेहमीच चर्चेत असतात. आता अनुष्काचा एक नवा व्हिडिओ (new video) व्हायरल (viral) झाला आहे ज्यात ती आमिर खानच्या (Aamir Khan) गाजलेल्या '3 इडियट्स' (3 Idiots) या चित्रपटासाठी ऑडिशन (audition) देत आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती मुन्नाभाई एमबीबीएस (Munna Bhai MBBS) या चित्रपटातील एक संवाद (dialogue) बोलताना दिसत आहे जो मूळ चित्रपटात अभिनेत्री ग्रेसी सिंगच्या (Gracy Singh) तोंडी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by nushkie♡ (@anushka.loops)

'3 इडियट्स'नंतर 5 वर्षांनी केले आमिर खानसोबत काम

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा वयाने फारच लहान दिसत आहे. यात तिने हिरव्या रंगाचा टॉप घातला आहे. अनुष्काच्या या व्हिडिओवर तिचे चाहते उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. ऑडिशन दिल्यानंतरही '3 इडियट्स' या चित्रपटासाठी तिची निवड झाली नाही. मात्र 5 वर्षांनंतर राजकुमार हिरानी यांनी पीके या चित्रपटासाठी आमिर खानसोबत तिची निवड केली ज्यात तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री ते निर्माती असा झाला अनुष्काचा प्रवास

अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी 2017मध्ये विवाह केला. तिच्या कामाच्या आघाडीबद्दल बोलायचे झाले तर तिचा शेवटचा चित्रपट शाहरुख खानसोबतचा झीरो हा होता. या चित्रपटात कॅटरीना कैफचीही भूमिका होती. नुकतेच अनुष्काने निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले होते आणि तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. याआधी तिची निर्मिती असलेली पाताललोक ही वेबसीरीज प्रदर्शित झाली होती जी अतिशय लोकप्रिय झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी