Anushka Sharma Bikini Photo: अनुष्का शर्माच्या हॉट बिकिनी फोटोवर विराट कोहलीची कमेंट 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Aug 19, 2019 | 14:54 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही सिनेमांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर अनुष्का बरीच एक्टिव्ह असते. हल्लीच तिनं इंस्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो आता व्हायरल होत आहे.

Anushka Sharma
अनुष्का शर्माच्या हॉट बिकिनी फोटोवर विराट कोहलीची कमेंट   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अनुष्का शर्मानं शेअर केला समुद्र किनाऱ्यावरील एक हॉट फोटो
  • अनुष्का शर्मानं शेअर केला बिकिनी फोटो
  • अनुष्काच्या फोटोवर पती आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं केली कंमेन्ट

Anushka Sharma Bikini Photo: बॉलिवूड एक्ट्रेस अनुष्का शर्मा बॉलिवूडमधली एक प्रसिद्ध एक्ट्रेस आहे. रब ने बना दी जोडी या सिनेमातून अनुष्कानं आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. त्यानंतर अनुष्कानं मागं वळून पाहिलं नाही. मोठ्या पडद्यावर अनुष्कानं आतापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. दरम्यान आता अनुष्का बऱ्याच काळपासून बॉलिवूडमधून दुरावली आहे. पण सिनेमांपासून दूर असली तरीही अनुष्का सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपली पर्यनल आणि प्रोफेशनल लाइफ अपडेट ठेवत असते.

अनुष्का शर्मा सध्या पती आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत मियामीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिनं आपल्या सुट्टीतला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो बघून तुम्हांला नक्कीच वेड लागेल. या फोटोत अनुष्कानं बिकिनी घातली आहे. या बिकिनीत अनुष्का कमालीची हॉट दिसत आहे. यात अनुष्का ऑरेंज रंगाची बिकिनीत दिसत आहे. ज्यावर स्ट्राइप्ड प्रिंट आहे. अनुष्का बिकिनी घालून समुद्र किनारी बसून स्माइल करत आहे. तिनं आपला हा लूक ड्रॉप ईयररिंग्स आणि सनग्लासेजनं एक्सेसराइज केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun kissed & blessed

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या फोटोत अनुष्का खूप कमी मेकअपमध्ये दिसतेय. तिनं आपले केस सेंटर पार्टिंगसोबत बन बांधला आहे. हा फोटो शेअर करत अनुष्कानं कॅप्शन दिलं आहे की, सन किस्ड अॅन्ड ब्लेस्ड. अनुष्काचा हा फोटो फॅन्स खूप पसंत करत असून फॅन्स फोटोवर सनशाइन, लव्हली, हॉट, नाइस असे कमेंट्स करत आहेत.  केवळ फॅन्सच नाही तर कोहलीनं सुद्धा अनुष्काच्या या फोटोवर कमेंट केली आहे. विराटनं हार्ट असलेल्या इमोजीसोबत कंमेट केली आहे. 

ही पहिलीच वेळ नाही आहे की, विराटनं अनुष्काच्या फोटोवर कंमेट केली आहे. याआधी ही बऱ्याचदा विराट कोहली अनुष्काच्या फोटोवर कंमेट करताना दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. अनुष्कानं स्वतःचा एक फोटो शेअर करताना ऑड्रे हेपबर्न याचा कोट शेअर केला आहे. अनुष्का म्हटलंय की, आनंदी राहणाऱ्या मुली कायम सुंदर असतात. (Happy girls are the prettiest - Audrey Hepburn) पत्नीच्या या चांगल्या फोटोवर विराटनं लगेच एक कमेंट केली आहे. माय लव्ह. तू कायमच सगळ्यांत सुंदर आहेस. (You are the prettiest all the time my love). या विराटच्या कमेंटचा स्क्रीन शॉट घेऊन अनेकांनी तो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy girls are the prettiest - Audrey Hepburn

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का शर्मा वर्कफ्रंट 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या आनंद एल रायच्या झिरो सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत दिसली. दरम्यान या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही. गेल्यावर्षी अनुष्काचे तीन सिनेमे परी, सुई धागा आणि झिरो रिलीज झाले होते. मात्र या वर्षी आतापर्यंत अनुष्कानं कोणाताही नवीन सिनेमा साइन केला नाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी