विराट कोहलीमुळे इंग्लंडमधल्या एका स्टेडियममध्ये विलगीकरणात अनुष्का शर्मा; वाचा इन्स्टाग्राम पोस्ट

बी टाऊन
Updated Jun 06, 2021 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा पती विराट कोहली आणि मुलगी वामिका यांच्यासह भारतीय संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली आहे. घरी काम आणू नये हे सूत्र सध्या विराटला लागू पडत नाही असे तिने म्हटले आहे.

Anushka Sharma
विराट कोहलीमुळे इंग्लंडमधल्या एका स्टेडियममध्ये विलगीकरणात आहे अनुष्का शर्मा, वाचा इन्स्टाग्राम पोस्ट  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या काय आहे अनुष्काची मजेदार कॅप्शन
  • अनुष्का-विराट मुलीला ठेवणार सोशल मीडियापासून दूर
  • 2008 साली अनुष्काने शाहरुखसोबत केले पदार्पण

नवी दिल्ली: सध्या बॉलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कुठे आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तिची ही ताजी पोस्ट (latest post) तुमच्यासाठीच आहे. काही दिवसांपूर्वी ती आपला पती (husband) विराट कोहली (Virat kohli) आणि मुलगी (daughter) वामिकासह (Vamika) जागतिक कसोटी अजिंक्यपद (world test championship) स्पर्धेसाठी युनायटेड किंगडमला (United Kingdom) गेली होती. तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचा एक सुंदर फोटो (photo) अपलोड केला आहे ज्यात ती साऊथअँपटनच्या (Southampton) एका स्टेडियममध्ये (stadium) क्वारंटाईन (quarantine) असलेली दिसत आहे.

जाणून घ्या काय आहे अनुष्काची मजेदार कॅप्शन

या फोटोत ती क्रीम रंगाचा स्वेटशर्ट आणि त्याला साजेशा रंगाच्या ट्राऊजर्समध्ये दिसत आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिले आहे, "घरी काम आणू नये हे सूत्र येते काही दिवस विराटला लागू पडणार नाही." यासोबतच तिने #QuarantineAtTheStadium. असा हॅशटॅगही टाकला आहे. भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ यूकेला गेल्यानंतर सध्या एजीस बाऊल, साऊथअँपटन इथे विलगीकरणात आहेत.

अनुष्का-विराट मुलीला ठेवणार सोशल मीडियापासून दूर

गेल्या बुधवारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांची मुलगी वामिकासोबत यूकेला रवाना होताना मुंबई विमातळावर दिसले होते. या दोघांनी 2017मध्ये विवाह केला होता आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांनी संवाद साधताना विराटने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ सांगितला होता आणि म्हटले होते, "एक जोडपे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमच्या बाळाला तोपर्यंत सोशल मीडियावर आणायचे नाही जोपर्यंत सोशल मीडिया काय आहे हे तिला कळत नाही आणि तिचे स्वतःचे निर्णय ती घेऊ शकत नाही." वामिका म्हणजे दुर्गादेवीचे एक नाव असल्याचे त्याने सांगितले होते.

2008 साली अनुष्काने शाहरुखसोबत केले पदार्पण

2008 साली रब ने बना दी जोडी या चित्रपटातून किंग खान शाहरुख खानसोबत अनुष्का शर्माने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते आणि आता ती बॉलिवुडमधील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहे. तिने सुलतान, एनएच 10, बँड बाजा बारात, दिल धडकने दो आणि ऐ दिल है मुश्किल या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी