मूळच्या अयोध्येच्या असलेल्या अनुष्का शर्माला करियर घडवण्यासाठी करावा लागला नाही संघर्ष

बी टाऊन
Updated May 01, 2021 | 11:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला. आज ती आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. ती आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आहे. तिने 2008 साली करियरची सुरुवात केली.

Anushka Sharma
मूळच्या अयोध्येच्या असलेल्या अनुष्का शर्माला करियर घडवण्यासाठी करावा लागला नाही संघर्ष  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अनुष्काने मॉडेलिंगपासून केली होती करियरला सुरुवात
  • किंग खानसोबत केले बॉलिवुडमध्ये पदार्पण
  • अनुष्का आणि विराटने साजरा केला मुलीच्या जन्माचा आनंद

बॉलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) जन्म 1 मे 1988 रोजी झाला. आज ती आपला 33वा वाढदिवस (birthday) साजरा करत आहे. ती आज एक प्रसिद्ध अभिनेत्री (famous actress) आहे. तिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये (leading actresses) आहे. तिने 2008 साली करियरची (career) सुरुवात केली. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या करियरबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल (private life) काही खास गोष्टी.

अनुष्काने मॉडेलिंगपासून केली होती करियरला सुरुवात

अनुष्का शर्माचा जन्म उत्तरप्रदेशातील अयोध्येत झाला. तिने सुरुवातीचे शिक्षण बंगळुरू येथे घेतल्यानंतर मायानगरी मुंबईत प्रवेश केला. तिने मॉडेलिंगपासून आपल्या करियरची सुरुवात केली. 2007मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये रँपवॉक केला. यानंतर ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. तिने फक्त एकच वर्ष मॉडेलिंग केले आणि नंतर तिला बिग बजेट चित्रपटातून हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.

किंग खानसोबत केले बॉलिवुडमध्ये पदार्पण

2008 साली अनुष्का शर्माने यशराज फिल्म्सच्या 'रब ने बना दी जोड़ी' या चित्रपटासाठी ऑडिशन दिली ज्यात तिची निवड झाली आणि पुढील तीन चित्रपटांसाठी ती करारबद्ध झाली. 2008मध्ये तिने 'रब ने बना दी जोड़ी'मधून शाहरुख खानसोबत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटापासूनच तिने चाहत्यांची मने जिंकली. यानंतर तिने तीन्ही खान्ससोबत काम केले जी एक खूप मोठी गोष्ट आहे. सलमान खानसोबत 'सुल्तान' आणि आमिर खानसोबत 'पीके' या चित्रपटात ती दिसली. स्वतःचे करियर फक्त अभिनयापुरते मर्यादित न ठेवता तिने निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि एनएच 10, फिल्लौरी, परी आणि बुलबुल अशा चित्रपटांची निर्मिती केली.

अनुष्का आणि विराटने साजरा केला मुलीच्या जन्माचा आनंद

11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का शर्माने इटलीच्या लेक कोमो इथे भारतीय क्रिकेटर विराट कोहलीशी विवाह केला. यानंतर साधारण 3 वर्षांनी हे दोघे आईबाबाही झाले आहेत. जानेवारी 2021मध्ये त्यांच्या मुलीचा वामिकाचा जन्म झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी