गोव्यात Relax mood मध्ये दिसले विराट-अनुष्का 

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 11:28 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Virat kohli and anushka sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. हे कपल सध्या गोव्यात आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. दोघांचे गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

anushka sharma and virat kohli
अनुष्का शर्मा, विराट कोहली  |  फोटो सौजन्य: Instagram

Virat kohli and anushka sharma enjoying vacation in goa: येत्या ३० मे रोजीपासून आयसीसी वर्ल्ड कपची सुरूवात होणार आहे. बघायला गेलं तर या वर्ल्ड कप सुरू होण्यास आता जवळपास १३- १४ दिवसच बाकी आहेत. अशातच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही दोघंबी काही सुंदर क्षण एकत्र घालवताना दिसले. सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हे कपल एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहेत. 

अनुष्का आणि विराट यांचा हा फोटो गोव्यातील आहे. गोव्यात हे कपल एका रेस्टॉरंटमध्ये क्वॉलिटी टाइम घालवताना दिसत आहेत. फोटोमध्ये विरूष्कासोबत एक मित्र देखील दिसत आहे. या मित्रासोबत दोघं ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे काही व्हिडिओज देखील समोर आले आहेत. जे गोव्या विमानतळावरचे आहेत. यात फॅन्स या कपलसोबत फोटो घेताना दिसत आहेत. 

विराट कोहली पूर्णपणे वर्ल्डकपसाठी तयार आहे. आयपीएल २०१९ नंतर आता टीम इंडिया वर्ल्डकपची तयारी करत आहे. विराट कोहलीची आयपीएल २०१९ मध्ये कामगिरी चांगली नव्हती. विराट कोहलीची टीम रॉयल्स चॅलेजर्सं बंगळुरू प्ले ऑफमध्ये ही पोहोचू शकली नाही. दुसरीकडे अनुष्का शर्मानं सध्यातरी कोणाताही सिनेमा साइन केला नाही आहे. अनुष्का गेल्या डिसेंबर महिन्यात आलेला सिनेमा झिरोमध्ये दिसली होती. त्यानंतर अनुष्कानं कोणताही सिनेमा साइन केला नाही आहे. 

विराट आणि अनुष्का बऱ्याचदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत असतात. जिथे जिथे त्यांना एकत्र फिरण्याची संधी मिळते. ते ती सोडत नाही. आयपीएल २०१९ च्या सीझनमध्ये सामन्याच्या आधी अनुष्का आणि विराट एका मॉलमध्ये फिरताना दिसले. त्यावेळी गेमिंग झोनमध्ये गेम खेळतानाचा दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

विरूष्काची जोडी बंगळुरूच्या एका मॉलमध्ये व्हर्चुअल रिअॅलिटी शूटिंग गेम खेळताना दिसले. व्हिडिओमध्ये बघू शकतो की, अनुष्कानं हातात एक बंदूक घेतली आहे आणि विराट तिच्यासमोर मरण्याची एक्टिंग करताना दिसतोय.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं २०१७ साली लग्न केलं. दोघं एकमेकांना बऱ्याच वर्षापासून डेट करत होते. विराट कोहली अनुष्का ही आपली सपोर्ट सिस्टम असल्याचं नेहमी सांगतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी